दिल्ली मुंबईच नव्हे, विराट आहे अलिबागकर; त्याचं 20 कोटींचं फार्महाऊस पाहिलं का?

विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या भारत आणि न्युझीलँड सामान्यमध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडत एक नवीन विक्रम गाजवला आहे.  कोहलीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर त्याच्या ODI कारकिर्दीतील 50 वे शतक झळकावले. आणि अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. तर सामन्यात विराटने 113 चेंडूत 117 धावा केल्या होत्या. विराट कोहली अनेकदा आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे सोशल मीडियावर ट्रेंड करत असतो. तर आज जाणून घेऊया विराट कोहलीच्या एकूण संपत्ती बद्दल...  

Nov 16, 2023, 14:10 PM IST

1/8

मुंबईतील अलिबाग हे अत्यंत प्रसिद्ध डेस्टिनेशन आहे म्हणूनच गेल्या काही वर्षांत अनेक उद्योगपती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी इथे बऱ्याच गुंतवणुकी केल्या आहेत. 

2/8

 तर विराटने गेल्या काही वर्षांमध्ये रिअल इस्टेट प्रकल्पांमध्येही गुंतवणूक केली आहे.

3/8

तसेच  विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी अलीकडेच अलिबाग शहरात आठ एकर जमीन खरेदी केली होती. आणि त्यावेळी अनुष्का आणि विराटने दोन वेगवेगळ्या प्रापर्टीमध्ये गुंतवणूक केली होती.  

4/8

तर त्यापैकी एक जमीन 2.54 एकर आणि दुसरी 4.91 एकर आहे आणि याची एकूण रक्कम सुमारे 19.24 कोटी अशी सांगितली जाते. 

5/8

तर अनुष्का आणि विराटच्या ड्रीम फार्म हाऊजची डील विराटच्या भावाने म्हणजे विकास कोहलीने केली होती. आणि नंतर त्या जमिनीवर फार्महाऊस बांधण्यात आले. 

6/8

देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत विराट कोहलीच्या नावाचाही समावेश आहे आणि  विराटची एकूण संपत्ती 1050 कोटी रुपये आहे.

7/8

विराटाचे मुंबई, दिल्ली आणि गुडगाव इथे घरे आहेत. मुंबईतील वरळी भागात विराटने  2016 मध्ये 34 कोटी रुपयांचे अपार्टमेंट खरेदी केले होते. याशिवाय विराटाचे गुरुग्राम (गुडगाव) इथे डीएलएफ फेज मध्येही घर आहे. हे घर त्यांनी 2015 मध्ये 80 कोटी रुपयांना विकत घेतले होते.

8/8

विराट कोहली भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूनपैकी एक आहे त्याला त्याच्या फिटनेस आणि कारकिर्दीतील उत्कृष्ट कामगिरीमुळे चाहत्यांचे भुरपूर प्रेम मिळतं