...अन् Putin थेट Ukraine मध्ये पोहोचले; स्वत: चालवली कार! पाहा Surprise Visit चे Photos

Putin Visit To Occupied Mariupol: युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर पहिल्यांदाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियाने ताब्यात घेतलेल्या युक्रेनच्या समुद्रकिनाऱ्यावरील मारियुपोल शहराला भेट दिली. यापूर्वी पुतिन यांनी क्रीमियाचा दौरा केला होता. या भेटीदरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. ही भेट कशासाठी होती, कधी झाली जाणून घेऊयात...

Mar 20, 2023, 13:31 PM IST
1/10

Putin Visit To Occupied Mariupol

युद्ध सुरु झाल्यानंतर युक्रेनमधील डोनबास क्षेत्रामध्ये रशियाच्या ताब्यात असलेल्या प्रांतांमध्ये पुतिन यांनी दौरा केला. त्यांनी हा दौरा शनिवारी (18 मार्च) रोजी केली.

2/10

Putin Visit To Occupied Mariupol

त्यापूर्वी 17 मार्च रोजी त्यांनी क्रीमियाचा दौरा केला. दोन दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने (आयसीसीने) रशियन राष्ट्राध्यक्षांविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. असं असतानाच पुतिन यांनी केलेला हा दौरा अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

3/10

Putin Visit To Occupied Mariupol

वर्षभराहून अधिक काळापासून सुरु असलेल्या संघर्षामध्ये रशियन लष्कराने मारियुपोल हे युक्रेनकडून आपल्या ताब्यात घेतलं. या युद्धामधील हा रशियाचा पहिला विजय होता. हीच गोष्ट अधोरेखित करण्यासाठी आता पुतिन स्वत: या ठिकाणी भेट देऊन आले आहेत.

4/10

Putin Visit To Occupied Mariupol

रशियन वृत्तसंस्था क्रेमलिनच्या हव्याल्याने पुतिन हेलिकॉप्टरने मारियुपोलला पोहोचले. त्यांनी या ठिकाणी अनेक अधिकाऱ्यांबरोबरच रशियन समर्थक नागरिकांचीही भेट घेतली.  

5/10

Putin Visit To Occupied Mariupol

या दौऱ्यादरम्यान पुतिन यांनी मारियुपोलमधील अनेक जिल्ह्यांना भेट दिली. या दौऱ्यानंतर सुरक्षा आणि सहयोगासंदर्भातील युरोपीय संघटनेनं (ओएससीई) मारियुपोलमध्ये गरोदर महिलांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर हल्ला करणे हा युद्ध गुन्हा होता असं म्हटलं आहे.

6/10

Putin Visit To Occupied Mariupol

इंटरफॅक्स एजन्सीने क्रेमलिनने दिलेल्या वृत्तानुसार राज्याच्या प्रमुखांनी यॉट क्लब, थिएटर बिल्डिंग, शहरामधील प्रेक्षणीय स्थळांची पहाणी केली.

7/10

Putin Visit To Occupied Mariupol

मारियुपोल डोनेट्स्क या वादग्रस्त भागातील प्रांत आहे. युक्रेनबरोबरच युरोपीयन राष्ट्रांनी हे चुकीचं असल्याचं म्हटलं होतं. मात्र रशियाने आणि पर्यायाने पुतिन यांनी या दाव्याला, आरोपांना विशेष महत्त्व दिलं नाही.

8/10

Putin Visit To Occupied Mariupol

विशेष म्हणजे या भेटीदरम्यान पुतिन हे स्वत: मारियुपोलमध्ये कार चालवत होते. 

9/10

Putin Visit To Occupied Mariupol

तास या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पुतिन यांच्याबरोबर रशियाचे उप-राष्ट्राध्यक्ष मराट खुसुलिन हे सुद्धा कारमध्ये होते.

10/10

Putin Visit To Occupied Mariupol

मुख्य शहरामध्ये झालेलं नुकसान कसं भरुन काढता येईल, शहराचं सुशोभिकरण कसं करता येईल, याबद्दल पुतिन यांनी चर्चा केली. पुतिन यांनी फिलहारमोनिक हॉललाही यावेळेस भेट दिली. रशियन नेते मारियुपोलच्या पूर्वेला असलेल्या रशियाच्या भूभागावरील रोस्तो-ऑन-डॉनमध्ये सर्व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.