ऐश्वर्या रायचं डबल डेटींग? निकटवर्तीय म्हणाला, 'ऐश्वर्या मोबाईलवरुन अगदी आतापर्यंत सलमानच्या...'

Aishwarya Rai Double Dating: सध्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील कथित वाद चर्चेचा विषय ठरत आहे. असं असतानाच एकेकाळी ऐश्वर्या सलमान खान आणि विवेक ओबोरॉयला एकाच वेळी डेट करत असल्याची शंका सलमानच्या एका निकटवर्तीयाने व्यक्त केली आहे. नेमकं काय म्हटलंय या व्यक्तीने जाणून घेऊयात...

| Sep 02, 2024, 08:42 AM IST
1/13

aishwaryarai

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्यासंदर्भात सलमानच्या निकटवर्तीयाने बोलताना ती घरच्या सदस्याप्रमाणे आमच्याकडे यायची जायची असं सांगतानाच तिच्यावर गंभीर आरोप केलेत. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण...

2/13

aishwaryarai

बॉलिवूडमधील अनेक जोडपी आज आदर्श जोडपी म्हणून वावरताना दिसतात. मात्र त्याचवेळी जळून न आलेल्याही अनेक जोड्या अगदी वर्षानूवर्ष चर्चेत असतात. अशीच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय!  

3/13

aishwaryarai

हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वात वाईट आणि टोकाचं ब्रेकअप झालेल्या जोड्यांमध्ये आवर्जून नाव घेता येईल अशी सलमान आणि ऐश्वर्या यांची लव्हस्टोरी आहे.  

4/13

aishwaryarai

ऐश्वर्याने 'हम दिल दे चुके सनम'मध्ये सलमानबरोबर एकत्र काम केलं त्याचवेळेस या दोघांचं प्रेमप्रकरण सुरु होतं. मात्र नंतर सलमानबरोबरचं हे नातं टिकवण्यासाठी ऐश्वर्याने बरेच प्रयत्न केल्याचं तिने त्यावेळी ब्रेकअपनंतर अनेक मुलाखतींमध्ये जाहीरपणे सांगितलं.

5/13

aishwaryarai

सलमान खान ड्रिंक अॅण्ड ड्राइव्ह प्रकरणामध्ये अडकला त्याच्या काहीकाळ आधीच ऐश्वर्याच्या या मुलाखती समोर आल्या होत्या. बेदरकारपणे गाडी चालवून एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी सलमान कारणीभूत ठरल्यानंतर या दोघांचं नातं अधिक कमकुवत झालं. केवळ मनोरंजन क्षेत्रच नाही तर चाहत्यांमध्येही या नात्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरु झाल्या.   

6/13

aishwaryarai

हे कमी म्हणून की काय अचानक ऐश्वर्याचा जवळचा मित्र विवेक ऑबोरॉयने थेट प्रसारमाध्यमांसमोर येत सलमानवर गंभीर आरोप केले. यामुळे सलमानची प्रतिमा अधिक खराब झाली.   

7/13

aishwaryarai

मात्र त्यावेळी सलमानच्या पाठीशी त्याला धाकटा भाऊ सोहेल खान उभा राहिला. सोहेलनेही उघडपणे काही गंभीर आरोप प्रसारमाध्यमांसमोर केले होते.

8/13

aishwaryarai

थेट ऐश्वर्या रायचं नाव घेऊन सोहेलने अनेक गंभीर दावे केले होते. ऐश्वर्या रायची प्रतिमा त्यावेळेस गर्ल नेक्स्ट डोअर अशी होती. मात्र सोहेलने केलेल्या गंभीर आरोपांनंतर ऐश्वर्यालाही राग अनावर झाला आणि तिने सलमान खानला मद्यपी असल्याचा आरोप केला. मोठ्या भावावर होणारे हे आरोप ऐकून सोहेलने कठोर शब्दांमध्ये ऐश्वर्यावर निशाणा साधला होता.  

9/13

aishwaryarai

"आता ती सार्वजनिकपणे अश्रू ढाळत आहे. मात्र ज्यावेळेस ती (सलमानबरोबर) त्याच्याबरोबर फिरत होती, वरचे वर आमच्या घरी कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे भेटी देत होती त्यावेळेस तिने सलमानबरोबरच्या नात्याला दुजोरा दिला होता का?" असा सवाल सोहेलने प्रसारमाध्यमांसमोर बोलताना उपस्थित केला होता.

10/13

aishwaryarai

"तिने कधीच सार्वजनिकपणे या नात्याला स्वीकारलं नाही. त्यामुळेच सलमान या नात्याबद्दल संभ्रमावस्थेत होता. तिला आपल्याबरोबर राहण्यामध्ये किती रस आहे हे त्याला पाहायचं होतं. मात्र तिने कधीच त्याला त्यांच्या नात्याबद्दल विश्वास निर्माण होऊ दिला नाही," असं सोहेल ऐश्वर्यावर टीका करताना म्हणाला होता.  

11/13

aishwaryarai

संतापलेला सोहेल एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने ऐश्वर्या एकाच वेळी विवेक ओबोरॉय आणि सलमान खान दोघांनाही फसवत होती असा आरोप करत थेट डबल डेटींगचा आरोप केला. 

12/13

aishwaryarai

"ऐश्वर्या मोबाईलवरुन अगदी आतापर्यंत सतत सलमानच्या संपर्कात असायची. त्यामुळेच विवेक नाराज झाला आहे," असंही सोहेल त्यावेळेस म्हणाला होता.  

13/13

aishwaryarai

मात्र या वादावर काही काळानंतर पडता पडला. सलमान ऐश्वर्याच्या ब्रेकअपनंतर विवेक आणि ऐश्वर्याचंही नातं फार काळ टीकलं नाही. ऐश्वर्याने 2007 साली अभिषेक बच्चनबरोबर लग्न केलं. विवेकचंही लग्न झालं. सलमान अद्याप अविवाहितच आहे. मात्र या तिघांमधील हा आरोप-प्रत्यारोपांसहीत झालेला वाद त्यावेळेस चांगलाच गाजला होता.