RCB vs MI: LIVE सामन्यात मोठी दुर्घटना, Dinesh Karthik-Siraj मध्ये जोरदार टक्कर; पाहा नेमकं काय झालं?

IPL 2023 MI vs RCB: रविवारी खेळल्या जात असलेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) आरसीबीच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केल्याचं दिसून आलंय.  मात्र, या सामन्यात  मोठी दुर्घटना झाल्याचं दिसून आलंय.

Apr 02, 2023, 21:59 PM IST

IPL 2023, MI vs RCB: रविवारी खेळल्या जात असलेल्या मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात (Royal Challengers Bangalore vs Mumbai Indians) आरसीबीच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केल्याचं दिसून आलंय. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजांनी निर्णय योग्य ठरवला आहे. मात्र, या सामन्यात  मोठी दुर्घटना झाल्याचं दिसून आलंय. (WATCH Mohammed Siraj and Dinesh Karthik collide on field drop Rohit Sharma catch in IPL 2023)

1/5

मुंबई इंडियन्सचा (MI) कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असताना एक चूक केली. रोहितने शॉर्ट बॉलवर पुल शॉट घेतला गेला.

2/5

रोहितने शॉर्ट बॉलवर पुल शॉट खेळायला गेला पण त्याला टॉप एज मिळाली. त्यामुळे बॉल हवेत राहिला.

3/5

चेंडू हवेत गेल्याने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि दिनेश कार्तिक झेल घेण्यासाठी धावले. दोघांनीही कॉल दिला नाही.

4/5

मोहम्मद सिराज आणि दिनेश कार्तिक यांच्यात जोरदार टक्कर झाली, त्यामुळे दोघंही रोहितचा महत्त्वपूर्ण झेल घेण्यात अपयशी ठरले.

5/5

दरम्यान, मोहम्मद सिराज आणि दिनेश कार्तिक दोघंची टक्कर झाल्याने काही वेळ सामना थांबला होता.