close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

Mar 04, 2019, 12:17 PM IST
1/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

सौंदर्याच्या परिभाषा या शब्दांत मांडणं आजवर भल्याभल्यांना जमलं नाही. प्रत्येकाच्या नजरेत सौंदर्याची अशी एक वेगळी व्याख्या असते. जोवर ती व्याख्या उमगत नाही तोवर आणखी एक व्याख्या त्याला शह देण्यासाठी तयारच असते. सौंदर्याच्या अशा या विविधांगी व्याख्यांकडे पाहण्याचा एक नवा दृष्टीकोन देणारं फोटोशूट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हे फोटोशूट आहे एका अशा तरुणीचं, नववधूचं जिचं रुप पाहता, खरंच के काय कमाल आहे अशीच उत्स्फुर्त प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. ही प्रतिक्रिया तिच्या धाडसालाही दिली जाते. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)

2/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

ब्रायडल फोटोशूटमध्ये असा एकाएकी धाडसाचा उल्लेख होण्याचं कारणंही तसंच आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ब्रायडल फोटोशूट चांगलंच गायज आहे. फोटोशूट आहे वैष्णवी पूवनेंद्रन हिचं. सोशल मीडियावर नवी इंद्रन पिल्लई अशा तिच्या हँडलवरुन या फोटोशूटमधील काही निवडक फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. यामध्ये नवीचा चेहरा पाहता त्यावरुन झळकणारा आनंद एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातो. कारण कॅन्सरवर मात केल्याची भावना त्यातून झळकत आहे. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)

3/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

स्तनांच्या कर्करोगाशी अर्थान ब्रेस्ट कॅन्सशी लढा दिलेल्या वैष्णवीला तिच्या सौंदर्याची वेगळीच व्याख्य़ा जणू गवसली. मला कोणीही थांबवू शकत नाही... अगदी कॅन्सरही नाही असंच तिने यापैकी एका फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. हे कॅप्शन वाचून त्याचा थेट अर्थ लागत आहे. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)

4/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

सुरुवातीला कॅन्सर बरा होतो आहे, असं वाटत असतानाच पाच वर्षांनी पुन्हा या आजाराने तिच्या आयुष्याला विळखा घातला. अर्थात तिने यावरही मात केली. पण, हा प्रवास तितका सोपा नव्हता. यामध्ये तिला आधार मिळाला हा तिच्या लढाऊ वृत्तीने. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)

5/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

लग्न हे प्रत्येकाच्याच आयुष्यात अतिशय महत्त्वाच्या प्रसंगांपैकी एक. त्यातही या खास दिवसाचं महत्त्व व्यक्त करणं कित्येकांसाठी कठीण. पण, वैष्णवीने आजारपणाच्या या आव्हानाने खचून न जाता त्यावरच मात केली आणि या साऱ्याचा आनंद एका सुरेख अशा ब्रायडल फोटोशूटच्या माध्यमातून साजरा केला. केस आणि भुवया, एखाद्या महिलेच्या सौंदर्याचे अतिशय महत्त्वाचे निकष आणि त्यांच्या अभावी सौंदर्याची कल्पना करणं अनेकांसाठी कठीण होऊन बसतं. पण, कित्येकदा खचण्यापेक्षा हा आजार मन आणखी धीट करुन जातं, हे तिचे फोटो आणि कॅप्शन वाचताना लक्षात येत आहे. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)

6/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

वैष्णवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तिच्या मेकअप आर्टीस्टनेही या खास फोटोशूटविषयी विस्तृत माहिती दिली. ब्लश, ब्युटी अँड बियाँडच्या मेकअप आर्टीस्टने तिचं वधूरुपाती सौंदर्य खुलवण्याचं काम जबाबदारीने पूर्ण केलं आहे. नैसर्गिक वाटाव्यात याकरता भुवयांचा एक- एक केस रेखाटण्यापासून, माथापट्टी कशाच्याही आधाराशिवाय, केसांच्याही अभावी तिच्या डोक्यावर सुरेखपणे बसवण्यात आल्याचं मेकअप आर्टीस्टने सांगितलं. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)

7/7

Bridal Photoshoot : तिला कोणीच थांबवू शकत नाही, कॅन्सरही नाही....

आजारपणाने खचून न जाता, त्याच आजारपणाकडे एक उर्जेचा आणि प्रेरणेचा द्योतक म्हणून पाहणारी वैष्णवी आणि तिचं हे अनोखं ब्रायडल फोटोशूट खऱ्या अर्थाने सौंदर्याचं प्रेरणादायी प्रतिक आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. छाया सौजन्य - (इन्स्टाग्राम : naviindranpillai / @celesgrd, @shi.vaa90)