फक्त 20 हजार रुपयांत 2 स्क्रीन असलेला Waterproof Smartphone, जाणून इतर वैशिष्ट्ये

Oukitel ने मजबूत स्मार्टफोन WP21 लाँच केला आहे. या फोनचे फीचर्स पाहून तुम्हीही खूश व्हाल. प्री-ऑर्डरमध्येच हा स्मार्टपोन सुपरहिट ठरला आहे. रशिया आणि ब्राझीलमध्ये या फोनला खूप पसंती मिळत आहे. मात्र सध्यातरी हा फोन भारतात लाँच झालेला नाही. बिग फ्रायडे सेल दरम्यान, Oukitel WP21 भारताबाहेर जवळपास 20,000 रुपयांना विकला जात आहे. ही ऑफर 29 नोव्हेंबरला संपणार आहे. जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Nov 28, 2022, 17:49 PM IST
1/5

Oukitel WP21

Oukitel WP21 हा एक रफ अँड टफ फोन आहे. फोनमध्ये ड्युअल डिस्प्ले, एक प्रीमियम कॅमेरा सेटअप आणि इतर फीचर्स आहेत.

2/5

Oukitel WP21

Oukitel WP21 मध्ये 6.78-इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन 2460 x 1080p रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनच्या मागील बाजूस दुसरा स्मार्ट डिस्प्ले आहे. हा फोन संगीत, कॉल, ब्लूटूथ आणि कॅमेरा नियंत्रित करू शकतो. 

3/5

Oukitel WP21

Oukitel WP21 या स्मार्टफोनमध्ये कॅमेऱ्याशी कोणतीही तडजोड केलेली नाही. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. पहिला 64MP Sony प्राथमिक सेन्सर, दुसरा 20MP Sony IMX350 ऑटोफोकस नाईट व्हिजन लेन्स उपलब्ध आहे आणि तिसरा 2MP मॅक्रो सेन्सर आहे. 

4/5

Oukitel WP21

Oukitel WP21 मध्ये मोठी 9800mAh बॅटरी आहे. जी 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 2 तास लागतील. फोन दीड ते दोन दिवस आरामात चालू शकेल.

5/5

Oukitel WP21

Oukitel WP21 हा IP68, IP69K आणि नवीनतम MIL-STD-810H प्रमाणित आहे. हा स्मार्टफोन वाळू, धूळ आणि पाणी प्रतिरोधक आहे. स्मार्टफोनचे पाऊस आणि धुळीच्या वादळात नुकसान होऊ शकत नाही.