Weekly Money Horoscope : 'या' राशींना होईल धनलाभासोबत यशस्वीतेचे शुभ योग

Weekly Money Horoscope 8 to 14 May 2023 : हा आठवडा अनेक राशींच्या शुभ सिद्ध होणार आहे. यशाचे शिखर गाठण्यासोबत आर्थिक फायदाचा हा आठवडा आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. (Weekly Finance Horoscope)

May 07, 2023, 07:57 AM IST

Weekly Money Horoscope 8 to 14 May 2023 : प्रत्येकाला जाणून घ्यायचं असतं आपल्यासाठी सुरु होणारा पुढच्या आठवडा हा आर्थिकदृष्ट्या कसा असणार आहेत. आपल्या आर्थिक स्थितीवरच अनेक गोष्टी अवलंबून असतात. कुटुंबाचा आनंद, मुलांचं भविष्य, रोजच्या व्यवहारातील अनेक गोष्टी या पैशांशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आर्थिक बाबात येणारा आठवडा तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या. (weekly financial horoscope 8 to 14 may 2023 money career Weekly Money Horoscope in marathi)

1/13

आर्थिक राशीभविष्य

मे महिन्याचा दुसरा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असणार आहे ते आपण जाणून घेणार आहात. मेष, वृषभ, मिथुन यासह सर्व 12 राशींच्या नशिबात काय आहे चला बघूयात.  

2/13

मेष (Aries)

हा आठवडा तुमच्यासाठी खर्चिक ठरणार आहे. कामात आणि आर्थिक व्यवहारात हेराफेरी करु नका. मात्र व्यावसायिक प्रवासातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. 

3/13

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यशाली आहे. कुटुंबातही आनंदची बातमी मिळणार आहे. तुमच्या नशिबात यशाचे खास योगायोग या आठवड्यात घडणार आहे. 

4/13

मिथुन (Gemini)

या आठवड्यात आरोग्याची समस्या जाणवणार आहे, त्यामुळे खर्च होणार आहे. विश्वासाने एखाद्या गोष्टीबद्दल विचारपूर्वक निर्णय घेतल्यास त्यात यश मिळेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती जरा अनुकूल असेल. 

5/13

कर्क (Cancer)

हा राशीच्या आठवडा आर्थिकबाबतीच चांगला असणार आहे. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. प्रवासातून आर्थिक स्थिती चांगली होणार आहे. मात्र कुटुंबात जरा चलबिचल असेल.   

6/13

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक संपत्तीच्या आगमनाचा शुभ संयोग आहे. हा आठवडा तुमची आर्थिक स्थिती मजबूत करणार ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी काळजी घ्या अन्यथा समस्या वाढू शकतात.

7/13

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठीही आर्थिकदृष्ट्या खूप शुभ असणार आहे. मालमत्तेतून धनलाभ होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.

8/13

तूळ (Libra)

हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ असणार आहे. अचानक धनलाभ होण्याचे शुभ संयोग असणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे.   

9/13

वृश्चिक (Scorpio)

कुटुंबातून एखादी आनंदाची बातमी मिळणार आहे. त्यामुळे मन प्रसन्न राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सकारात्मक असणार आहे. मात्र थोड्या खर्च वाढणार आहे. आठवड्याचा शेवटी सुख समृद्धी येणार आहे. 

10/13

धनु (Sagittarius)

या राशीसाठी यशाचे मार्ग उघड होणार आहे. समाजात मान सन्मान आणि प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत. आर्थिक प्रगतीसाठी हा आठवडा असणार आहे.   

11/13

मकर (Capricorn)

या राशीसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवड्यात चढउतार असणार आहे. या आठवड्यात जास्त खर्च होणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी अशुभ बातमी समजणार आहे. कुटुंबातील सदस्यांचा आरोग्याकडे लक्ष द्या.   

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या शुभ असणार आहे. गुंतवणुकीतून भविष्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. व्यावसायिकांना प्रवासातून नवीन ओळखी होणार आहेत. कामाच्या ठिकाणी आनंद वातावरण असणार आहे. 

13/13

मीन (Pisces)

हा आठवडा आर्थिक प्रगतीसोबत यश घेऊन आला आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण असणार आहे. हा आठवडा प्रसन्न असणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)