Charles III Coronation: भारताचा 'कोहिनूर' कुठंय? क्वीन कॅमिलाच्या मुकुटावरून हिरा गायब??
Kohinoor Diamond, King Charles III: कँटरबरीचे आर्चबिशप यांनी ब्रिटनच्या राजाचा राज्याभिषेक केला. त्यावेळी किंग चार्ल्स यांना ३६० वर्षे जुना मुकुट डोक्यावर चढवला. मात्र, यावेळी एक गोष्ट मिसिंग होती ती म्हणजे कोहिनूर हिरा.
Charles III Coronation: ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरे (King Charles III's coronation) यांचा राज्याभिषेक सोहळा लंडनमधील वेस्टमिन्स्टर (Westminster Abbey) येथे मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. सुमारे 1 हजार कोटींचा खर्च करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जमलेल्या शेकडो नागरिकांच्या साक्षीने हा राज्याभिषेक सोहळा पार पडला. मात्र, या राज्याभिषेक सोहळ्यात सर्वांच्या नजरेआड राहिला तो भारताचा कोहिनूर (Kohinoor Diamond) हिरा.