Weekly Love Horoscope : हा आठवडा कर्कसह 'या' राशींसाठी रोमँटिक, तुमचं लव्ह लाइफ कसं असणार?

Weekly Horoscope 01 to 07 May 2023 Love Prediction : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शुक्र परिवर्तन करणार आहे. शुक्र हा ग्रह प्रेम जीवनासाठी महत्त्वाचा मानला जातो. अशात कर्कसह 'या' राशींसाठी हा आठवडा रोमँटिक असणार आहे.  

| Apr 30, 2023, 09:53 AM IST

Weekly Love Horoscope 01 to 07 May 2023 in marathi : आठवड्याची सुरुवात प्रेमाचा प्रतिक शुक्र ग्रहाच्या परिवर्तनाने होणार आहे. त्यामुळे हा आठवडा काही राशींच्या लोकांसाठी रोमँटिक असणार आहे. चला तर मग जाणून घ्या तुमचं लव्ह लाइफ या आठवड्यात कसा असणार आहे. 

1/12

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेम संबंधासाठी कठीण आहे. लव्ह लाइफमध्ये अहंकार बाजू ठेवल्यास नातं चांगल होईल. कुठल्याही निर्णय हा विचारपूर्वक आणि प्रेमाने घ्या. या आठवड्यात जोडीदारासोबत वेळ घालवा. 

2/12

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांना हा आठवडा प्रेम प्रकरणासाठी संघर्षमय असणार आहे. जोडीदारा आपल्याकडे लक्ष देत नाही आहे, असं तु्म्हाला वाटू शकतं. आठवड्याच्या शेवटी नातेसंबंध चांगले होतील. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा बेत बनवाल. 

3/12

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमप्रकरणासाठी अतिशय शुभदायक असणार आहे. जोडीदारासोबत जास्त वेळ आणि परस्पर प्रेम वाढविणारा ठरणार आहे. एकमेकांबद्दल आदर, विश्वास आणि प्रेम वाढविणारा हा आठवडा ठरणार आहे. वीकेंडला जोडीदार आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण व्यतित कराल. 

4/12

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालविणार आहात. संवाद आणि वेळ हा तुमच्या प्रेमाचा पाया असणार आहे. मात्र कुठलाही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. 

5/12

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने त्रासदायक ठरणार आहे. काही गैरसमजूती होण्याची शक्यता आहे. बाहेर लोकांमुळे नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो. रागाच्या भरात जोडीदाराला अपशब्द बोलू नका. नाही तर नातेसंबंध खराब होती. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे विचार करा. 

6/12

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने आणि उत्साहाने भरलेला असणार आहे. हा आठवडा म्हणजे जुन्या आठवणीचा उजाळा ठरणार आहे. आयुष्यात प्रेम प्रकरणात हा आठवडा आनंद आणि सकारात्मक भाव घेऊन आला आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी असाल आणि तुम्हाला शांत आणि उत्साहवर्धक वाटणार आहे.

7/12

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफमध्ये सुख आणि समृद्धीचा शुभ संयोग घेऊन आला आहे. हा आठवडा तुमच्या आयुष्यात भरपूर आनंद आणि परस्पर प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. जोडीदारासोबत रोमाँटिक क्षण घालवणार आहात. कुटुंबातही आनंदाचं वातावरण असणार आहे.

8/12

वृश्चिक (Scorpio)

हा आठवडा वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात आरामशीर असेल आणि आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या नातेसंबंधात खूप आरामशीर असाल आणि तुमच्या जोडीदाराच्या सहवासात आनंददायी वेळ घालवाल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते सुधारेल आणि तो तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. आठवड्याच्या शेवटी मात्र काही अडथळे निर्माण होऊ शकतात आणि ते तुम्ही बोलून सोडवू शकता.

9/12

धनु (Sagittarius)

या आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांसाठी प्रेमसंबंध रोमँटिक असतील आणि जीवनात आनंद दार ठोठावेल. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनाशी संबंधित काही चांगली बातमी देखील मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी, तुम्हीही काही गोंधळ बोलून सोडवा, तरच सुख-समृद्धी अबाधित राहील. नशीब तुमची साथ देईल आणि तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल.

10/12

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमप्रकरणाबद्दल संघर्षमय असणार आहे. नात्यामध्ये काही गोष्टीमुळे मतभेद होऊ शकतात. पण संवाद साधल्याने नात्यामधील तढा सुटणार. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा बेत आखाल.

11/12

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या दुष्टीने जरा कठीण असणार आहे. जोडीदाराच्या अपेक्षांवर तु्म्ही खरे उतरणार नाहीत. आठवड्याच्या मध्यतरी प्रेम जीवनात रोमान्स असणार आहे. जोडीदारासोबत या आठवड्यात तुम्ही मनातील प्रत्येक भावना मोकळेपणाने बोलू शकणार आहात. त्यामुळे नातेसंबंध मजबूत होणार आहे. 

12/12

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने अडचणीचा ठरणार आहे. नात्यामध्ये दुरावा आणि कडवटपणा येऊ शकतो. कोणत्याही निर्णय घेताना विचारांवर आणि मनावर संयम ठेवा. आठवड्याचा शेवट हा गोड होणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)