Weekly Horoscope : संकष्टी चतुर्थीचा हा आठवडा 12 राशींसाठी कसा असेल? 'या' लोकांवर बरसणार गणेशाची कृपा

Weekly Horoscope 22 to 28 July 2024 in Marathi : जुलै महिन्याचा शेवटचा आठवड्यात संकष्टी चतुर्थीसह गजकेसरी योगाचा संयोग जुळून आला आहे. यासोबत वृषभ राशीत गुरू आणि मंगळाची युती 12 राशींवर परिणाम करणार आहे. त्यामुळे जुलैचा हा शेवटचा आठवड्यात कोणावर गणेशाची कृपा बरसणार याबद्दल ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकर यांनी सांगितलंय. 

| Jul 22, 2024, 08:34 AM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांना हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक ठरणार आहे. तुमच्यासाठी पुन्हा पुन्हा आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होणार आहे.  जीवनात आनंद आणि शांती राहणार आहे. या आठवड्यात तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीसाठी काही महत्त्वाचे प्रवास करावे लागणार आहेत. त्यांचा फायदा तुम्हाला होणार आहे. तब्येतची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. या आठवडय़ात कामाच्या ठिकाणी संवादाने प्रश्न सोडवले तर बरं परिणाम मिळतील.  शुभ दिवस: 22, 24  

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांना या आठवड्यात आर्थिक बाबतीत फायदाच फायदा होणार आहे. तुम्ही खरेदीच्या मूडमध्ये असाल आणि घराच्या सजावटीवर खूप खर्च होणार आहे. या आठवड्यात तुमची तब्येत सुधारेल आणि तुम्हाला निरोगी वाटणार आहे. कुटुंबातील बंध जाणवू शकतात. तुम्ही उघडपणे कोणतेही मत मांडू शकत नाही. कामाच्या ठिकाणी अशांतता आणि तणाव राहणार आहे. आर्थिक बाबींमध्ये अहंकाराचा संघर्ष टाळल्यास चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास हिताच ठरेल. शुभ दिवस: 23,26  

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहेत. अधिक यश मिळविण्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागणार आहे. जर तुम्ही तुमच्या कनिष्ठांपैकी एकाला काही जबाबदारी दिली तर तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहे. हा काळ आर्थिक बाबतीत चांगला असणार आहे. तुम्हाला सुख, समृद्धी आणि आर्थिक लाभ होणार आहे. आरोग्य सुधारणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या तंदुरुस्तीवर थोडा खर्च करावा लागणार आहे. कुटुंबात सुख-समृद्धी नांदणार आहे. शुभ दिवस: 22,23  

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आठवडा प्रगतीचा आणि सन्मानचाही असणार आहे. या आठवड्यात सुरू झालेला कोणताही नवीन प्रकल्प तुमच्यासाठी शुभ असणार आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक तुमच्यासाठी संपत्तीत वृद्धीची ठरणार आहे. या आठवड्यात तुमची तब्येतही सुधारणार आहे. वडीलधाऱ्यांचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडणार आहे. कुटुंबात काही चांगली बातमी मिळणार आहे. या आठवड्यात प्रवासादरम्यान अडचणी येण्याची शक्यता असल्याने तो टाळल्यास बरं होईल. शुभ दिवस: 22,23,24  

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत आनंद आणि समृद्धीचा ठरणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य खूप सुधारणार आहे. पण काही गोष्टींबाबत मन अस्वस्थ असणार आहे. या आठवड्यात खर्च वाढणार आहे. तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबद्दल अस्वस्थ वाटण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-समृद्धी असणार आहे. तर काही चांगली बातमीही कानावर पडणार आहे. या आठवड्यात, सहली दरम्यान निराशा वाढू शकते आणि ते पुढे ढकलणे चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. सप्ताहाच्या शेवटी अहंकाराचे भांडण टाळले तर हिताच ठरणार आहे. शुभ दिवस: 23,24  

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहे. मातृ स्त्रीच्या मदतीने प्रकल्प यशस्वी होणार आहे. या आठवड्यात प्रवासात यश मिळणार आहे. प्रवासादरम्यान सुख-समृद्धी लाभणार आहे. कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार असून जीवनात सुखद अनुभव येणार आहेत. आर्थिक खर्च जास्त असणार आहे. गुंतवणुकीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. सप्ताहाच्या शेवटी मन अस्वस्थ असणार आहे. या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 23,25  

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. स्त्रीच्या मदतीने त्यांना गुंतवणुकीत यश मिळणार आहे. जीवनात आनंद दार ठोठवणार आहे. कामाच्या ठिकाणी नकारात्मक बातम्या कानावर पडणार आहे. तब्येत सुधारणा होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातून चांगली बातमी मिळणार आहे. या आठवड्यात कुटुंबातील एखाद्या व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी चर्चेद्वारे प्रकरणे सोडवल्यास चांगले परिणाम मिळतील. कोणाशीही पैशाचा व्यवहार करू नका अन्यथा तुमचे नुकसान होईल. शुभ दिवस: 22,25

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती करणार आहेत. प्रकल्प यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होईल. कुटुंबात सुखद अनुभव येतील आणि कुटुंबातील लहान सदस्याला सुखद अनुभव मिळणार आहे. आर्थिक खर्च जास्त असणार आहे. वृद्ध व्यक्तीमुळे खर्चातही वाढ होणार आहे. या आठवड्यात, प्रवासामुळे त्रास वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी प्राप्त प्राप्त होणार आहे. शुभ दिवस: 24,26  

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक लाभाचा ठरणार आहे. त्याशिवया सन्मानात वाढ होणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. जीवनात आनंद दार ठोठावणार आहे. या आठवडय़ात गुंतवणुकीतूनही फायदा होणार आहे. या आठवड्यात कुटुंबातील सदस्य पुढे येऊन तुम्हाला मदत करणार आहे. प्रवासातून तुम्हाला मध्यम यश मिळणार आहे. तुम्ही ते पुढे ढकलल्यास काही नुकसान होणार नाही. आठवड्याच्या शेवटी अनावश्यक वादविवाद टाळल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. इकडे तिकडे बोलण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास चांगले परिणाम मिळतील. शुभ दिवस: 22,23,24  

10/12

मकर (Capricorn Zodiac)

आर्थिक बाबतीत मकर राशीच्या लोकांसाठी काळ अनुकूल असून आर्थिक लाभासाठी मजबूत स्थितीचा असणार आहे. कोणीतरी पुढे येऊन तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये साथ देणार आहे. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबात परस्पर प्रेम वाढवण्याच्या अनेक संधी मिळणार आहे. या आठवड्यात प्रवासातूनही हळूहळू सुधारणा होणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकाराचे भांडण टाळले तर बरे होईल. परस्पर मतभेद निर्माण होऊ शकतात. या आठवड्याच्या शेवटी आनंददायी अनुभव येणार आहे. शुभ दिवस: 24, 26  

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत आनंद आणि समृद्धीचा ठरणार आहे. प्रवासात तुम्हाला शुभ योगायोग प्राप्त होणार आहे. तुमचे प्रेम जीवन सुखकर असणार आहे. कुटुंबातील सदस्यांमधील समजूतदारपणाही चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णयही घेणार आहात. नोकरीच्या ठिकाणी तरुण व्यक्तीमुळे भावनिक त्रास वाढणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्चही अधिक होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी कानावर पडणार आहे.  शुभ दिवस: 24,25,26  

12/12

मीन (Pisces Zodiac)

या राशीचे लोक त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती करणार आहे. त्यांचा सन्मानही वाढणार आहे. तुमच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही या आठवड्यात नियोजनाच्या मूडमध्ये असणार आहे. या आठवड्यात आर्थिक लाभ मिळणार आहे. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. कौटुंबिक प्रश्न चर्चेने सोडवले तर बरे परिणाम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखाद्याशी अहंकाराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 24, 25 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)