Weekly Horoscope : गणेशोत्सवाचा दुसरा आठवडा 12 राशींसाठी कसा? बुधादित्य राजयोग 'या' राशींना करणार श्रीमंत

Weekly Horoscope 9 to 15 september 2024 in Marathi : सप्टेंबरच्या हा दुसरा आठवड्यात, ग्रहांचा राजकुमार बुध सिंह राशीत अस्त करणार आहे. शुक्र चित्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, तर सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गणपती गौरीच आगमन 12 राशींच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या  ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कसा असणार आहे.

Sep 09, 2024, 23:49 PM IST
1/12

मेष (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांची नियोजित कामे सप्टेंबरच्या या आठवड्यात वेळेवर पूर्ण होणार आहेत. योग्य दिशेने केलेले प्रयत्न आणि कृती अनुकूल परिणाम देणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणीही तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होणार आहे. मात्र इतरांची खिल्ली उडवताना हे लक्षात ठेवा, कोणाचीही थट्टा करू नका, अन्यथा मित्रही शत्रू बनू शकतात. विशेषत: आठवड्याच्या मध्यात कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून सावध राहा. इमारत किंवा मालमत्तेशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. राजकारणाशी संबंधित लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी अधिक प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. प्रेम प्रकरणात तुम्हाला तुमच्या प्रिय जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. विद्यार्थी त्यांचा जास्तीत जास्त वेळ मजेत घालवणार आहे. शुभ रंग: हिरवा, भाग्यवान क्रमांक: 6

2/12

वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांनी सप्टेंबरच्या हा आठवडा खर्चिक असणार आहे. उत्पन्नापेक्षा जास्त खर्चाचा भार तुमच्यावर पडणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मुलांबाबत काही चिंता तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. पण आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्यावर उपाय शोधण्यात यशस्वी होणार आहात. मित्रांच्या मदतीने अपूर्ण कामं पूर्ण होणार आहे. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी बंधू-भगिनी इत्यादी तुमच्या निर्णयाचा आदर आणि समर्थन करणार आहेत. नवीन जबाबदाऱ्यांसह तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी नवीन स्थान मिळणार आहे. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला करिअर व्यवसायासाठी लहान किंवा लांबचा प्रवास करावा लागणार आहे. ज्यातून तुम्हाला आनंददायी परिणाम मिळणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल राहणार आहे. तुम्ही तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. शुभ रंग: लाल, भाग्यवान क्रमांक: 11  

3/12

मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या हा आठवडा त्रासदायक ठरणार आहे. तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी कोणतेही आव्हान समोर उभं राहणार आहे. तुम्ही त्याचा धैर्याने सामना करण्यात यशस्वी होणार आहात. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या योजना आणि ध्येये पूर्ण समर्पणाने पुढे जाव लागणार आहे. तुम्हाला तुमच्या कामाचं फळ बाप्पाचा कृपने मिळणार आहे. आजचे काम उद्यापर्यंत पुढे ढकलणे ही सवय मात्र टाळा, अन्यथा नुकसान सहन करावा लागेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शारीरिक थकवा किंवा निद्रानाश यासारख्या समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये सावधपणे पावले उचला, अन्यथा नात्यात गैरसमज वाढण्याची दाट शक्यता आहे. शुभ रंग: पिवळा, भाग्यवान क्रमांक: 2  

4/12

कर्क (Cancer Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा हा आठवडा बाप्पाच्या कृपेने अतिशय शुभ असणार आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश तुमच्यासोबत असणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी संपर्क होणार असून तुम्हाला लाभाच्या संधी मिळणार आहे. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहे. उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण होतील. घाऊक विक्रेत्यांपेक्षा लहान व्यावसायिकांसाठी शुभ काळ अधिक आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमचे मन काही अज्ञात भीतीने चिंतेत राहणार आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या. शुभ रंग: पांढरा, भाग्यवान क्रमांक: 8  

5/12

सिंह (Leo Zodiac)

या राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या या आठवड्यात वेळ आणि नातेसंबंध दोन्हीकडे खूप लक्ष देणे आवश्यक असणार आहे. तुमची नियोजित कामे पूर्ण व्हावीत असे वाटत असेल तर उद्यापर्यंत पुढे ढकलण्याऐवजी वेळेपूर्वी पूर्ण करा. जर काही कारणास्तव तुमच्या प्रिय व्यक्तीशी मतभेद होत असतील तर एक पाऊल मागे घ्या आणि त्याला पटवा. अन्यथा प्रस्थापित नाते तुटू शकतं. करिअर व्यवसायात, लोकांच्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटी तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला भेटू शकता. प्रेम जीवनात कोणत्याही प्रकारची घाई टाळा. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. शुभ रंग: जांभळा, भाग्यवान क्रमांक: 9  

6/12

कन्या (Virgo Zodiac)

या राशीच्या लोकांनी सप्टेंबरच्या या आठवड्यात बाप्पाची कृपा राहणार आहे. चांगला काळ जास्त वेळ राहणार नाही. आठवड्याच्या सुरुवातीला काही वाईट गोष्टींच्या भीतीने मन अस्वस्थ असणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी सर्व शंकांचे ढग दूर होणार आहेत. जीवनातील कोणताही मोठा अडथळा कुटुंबातील वरिष्ठ व्यक्तीच्या सल्ल्याने दूर होणार आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळणार आहे. कोणत्याही योजनेत किंवा व्यवसायात पैसे गुंतवण्यापूर्वी हितचिंतक किंवा वरिष्ठ व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही प्रकारच्या पेपर संबंधित बाबींमध्ये हलगर्जीपणा करू नका, अन्यथा तुम्हाला भविष्यात चिंता टाकू शकेल. कठीण प्रसंगी तुमच्या जोडीदाराची किंवा प्रेम जोडीदाराची साथ मिळाल्याने तुम्हाला खूप आराम मिळणार आहे. महिलांचा जास्तीत जास्त वेळ धार्मिक कार्यात जाणार आहे. शुभ रंग: तपकिरी, भाग्यवान क्रमांक: 12

7/12

तूळ (Libra Zodiac)

या राशीच्या लोकांना सप्टेंबरच्या या आठवड्यात करिअर आणि व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळणार आहे. परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होणार आहे. इमारती इत्यादींची खरेदी-विक्री किंवा पूर्वी कोणत्याही योजनेत पैसे गुंतवल्यास मोठा फायदा मिळणार आहे. तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला सासरच्या मंडळींचे पूर्ण सहकार्य मिळणार आहे. व्यवसायाच्या संदर्भात लांबचा प्रवास शक्य आहे. प्रवास सुखकर आणि लाभदायक ठरणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन किंवा प्रेम संबंध गोड ठेवण्यासाठी तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करा आणि त्यांना योग्य वेळ द्या. तुमच्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहा, अन्यथा तुमच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे घरात कलह निर्माण होईल. शुभ रंग: आकाशी निळा, भाग्यवान क्रमांक: 16

8/12

वृश्चिक (Scorpio Zodiac)

सप्टेंबरच्या या आठवड्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीच्या लोकांना व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करावा लागणार आहे. प्रवास आनंददायी आणि लाभदायक असणार आहे. परीक्षा स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी कानावर पडणार आहे. मुलांशी संबंधित कोणतीही मोठी चिंता दूर होणार आहे. मात्र कोणत्याही मोठ्या प्रकल्पात पैसे गुंतवण्यापूर्वी किंवा एखाद्याला कर्ज देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा, अन्यथा तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागण्याची शक्यता आहे. शक्य असल्यास, न्यायालयाबाहेर वैयक्तिक विवाद मिटवा, अन्यथा आपण दीर्घ कायदेशीर प्रक्रियेत अडकू शकता. प्रेम जीवनात कोणत्याही प्रकारची घाई टाळा. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. शुभ रंग: सोनेरी, भाग्यवान क्रमांक: 18

9/12

धनु (Sagittarius Zodiac)

सप्टेंबरच्या या आठवड्याच्या सुरुवातीला धनु राशीच्या लोकांना कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. प्रवासादरम्यान आरोग्य आणि सामान दोन्हीची काळजी घ्या. आठवड्याच्या सुरुवातीला एखादी प्रिय वस्तू गमावल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत नातेवाईकांशी वाद होऊ शकतात. कोणताही निर्णय घेताना आपल्या प्रियजनांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांची प्रतीक्षा थोडी वाढू शकते. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारीचे ओझे तुमच्या डोक्यावर पडू शकते. बाजारात अडकलेले पैसे काढण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी एकनिष्ठ राहा. त्रयस्थ व्यक्तीऐवजी स्वत: गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा. आईच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. शुभ रंग: नारिंगी भाग्यवान क्रमांक: 4 

10/12

मकर (Capricorn Zodiac)

नातेसंबंधाबद्दल हा आठवडा सुरुवातीला मकर राशीचे लोक दु:खी असणार आहेत.त्यांच्या बहिणी किंवा भावाशी संबंधित एखाद्या गोष्टीबद्दल मन अस्वस्थ असणार आहे. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारीचे ओझे तुमच्या डोक्यावर पडणार आहे. जमीन-इमारतीशी संबंधित वाद मिटवण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहा, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार आहे. कोणत्याही कागदावर स्वाक्षरी करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक वाचा, अन्यथा भविष्यात तुम्हाला नुकसान सहन करावा लागू शकतं. घाऊक विक्रेत्यांच्या तुलनेत लहान व्यावसायिकांसाठी हा काळ शुभ असणार आहे. लव्ह लाईफमध्ये तुमच्या लव्ह पार्टनरच्या भावनांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शुभ रंग: पांढरा, भाग्यवान क्रमांक: 6

11/12

कुंभ (Aquarius Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सुख, स्वप्न आणि दु:खाचे फुगे फुटत राहणार आहे. सप्टेंबरच्या या आठवड्यात तुम्हाला ही गाठ बांधावी लागणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या कामातील अडथळे किंवा परिणामांमुळे विचलित न होता तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करावी लागणार आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला महिला मित्राच्या मदतीने रखडलेल्या कामांना गती मिळणार आहे. मित्र किंवा भागीदारांसोबतचे गैरसमज दूर होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचे सहकार्य लाभणार आहे. आठवड्याच्या शेवटी कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. या काळात बहुतांश वेळ धार्मिक कार्यात व्यतीत होणार आहे. आरोग्याची विशेष काळजी घ्या, जुनाट आजार उद्भवू शकतात. शुभ रंग: गुलाबी, भाग्यवान क्रमांक: 15

12/12

मीन (Pisces Zodiac)

सप्टेंबरच्या या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी आपले ध्येय साध्य होईपर्यंत बाप्पाची आराधना करावी लागणार आहे. कारण त्यांच्या कामात छोटे-मोठे अडथळे येण्याची शक्यता आहे. कोर्टाशी संबंधित वाद बाहेर सोडवल्यास फायदा होणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना आठवड्याच्या मध्यात काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. घाऊक व्यापाऱ्यांना अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या योजनेवर काम करत असाल तर आठवड्याच्या शेवटी तुम्ही त्याला आकार देण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या प्रिय जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे. वैवाहिक जीवनात गोडवा असणार आहे. शुभ रंग: जांभळा, भाग्यवान क्रमांक: 10 (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)