Weekly Love Horoscope : गुरु गोचरमुळे हा आठवड्या तुमच्या लव्ह लाइफसाठी कसा असेल जाणून घ्या

गुरु गोचरमुळे (Guru Gochar 2023) गजकेसरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) तयार झाला अशा या शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या. 

Apr 17, 2023, 07:23 AM IST

Weekly Love Horoscope 17 to 23 April 2023 : गुरु गोचरमुळे (Guru Gochar 2023) गजकेसरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) तयार झाला अशा या शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या. 

1/13

Weekly Love Horoscope

Weekly Love Horoscope 17 to 23 April 2023 in marathi : या आठवड्याची सर्वात अतिशय शुभ योगाने सुरुवात झाली आहे. गुरु गोचरमुळे मीन राशीत चंद्र आणि गुरुची युती (Guru Chandra Yuti) होणार आहे. यामुळे गजकेशरी राजयोग (Gaj Kesari Rajyog 2023) जुळून आला आहे. त्यात गुरुवारी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण (Surya Grahan 2023) आणि शनिवारी अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2023 Date).. अशा अनेक शुभ आठवड्यातील तुमचं लव्ह लाइफ कसं असेल जाणून घ्या. 

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात सकारात्मक गोष्टींनी होणार आहे. तुमची लव्ह लाइफ आनंदी असणार आहे. जोडीदाराकडून तुम्हाला जास्त वेळ मिळणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंद आणि लव्ह लाइफ प्रसन्न असणार आहे. 

3/13

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लव्ह लाइफमध्ये आनंदाचे क्षण घालविणार आहात. जोडीदारासोबत भविष्याचे निर्णय तुम्ही या आठवड्यात घेणार आहात. हा आठवडा तुमचं प्रेम मजबूत करणारा ठरणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी जरा उदास वाटेल.   

4/13

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रेम संबंधात आंबट - गोड अनुभव घेऊन येणार आहे. हा आठवड्यात तुम्ही प्रेमासाठी जास्त वेळ देणार आहात. त्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ आणि मजबूत होणार आहे. प्रेमात कधी बाह्यहस्तक्षेप होऊ देऊ नका, अन्यथा नातेसंबंधात दुरावा येण्याची भीती आहे.   

5/13

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवड्या आनंदमय असणार आहे. त्यांचा प्रेम जीवनात सुख आणि सुसंवाद आणणारा ठरणार आहे. जोडीदारासोबत नातं अधिक मजबूत आणि घट्ट होणार आहे. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लन करणार आहात.

6/13

सिंह (Leo)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रफुल्लित करणारा ठरणार आहे. प्रेम जीवनात आंबटगोड क्षण येणार आहेत. नातेसंबंधात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे मन अस्वस्थ राहिल. बाह्य हस्तक्षेप तुमच्या प्रेम जीवनात अडचणी वाढवणार आहेत. 

7/13

कन्या (Virgo)

हा आठवड्या या राशीच्या लोकांच्या प्रेम प्रकरणासाठी कठीण असणार आहे. लव्ह लाइफबद्दल या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी सुख आणि समृद्धीचा शुभ योग आहे. नात्यासाठी केलेली मेहनत फळारुपाला येईल. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. रोमान्स आणि सुखाने समृद्ध असा हा आठवडा आनंद घेऊन येणार आहे. जोडीदारासोबत विकेंडला बाहेर जाण्याचा विचार कराल. प्रवासात अनोखळ व्यक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे. ती व्यक्ती भविष्यात सुखद अनुभव घेऊन येणार आहे.  

9/13

वृश्चिक (Scorpio)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी जरा कठीण असणार आहे. या आठवड्यात तुम्ही प्रेमाप्रती भावनांना कमी महत्त्व देणार आहात. कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी शंभर वेळा विचार करावा. लव्ह लाइफमध्ये तणाव वाढणार आहे.   

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी त्यांचं प्रेम जीवन आनंदाने भरलेलं असणार आहे. मन भावूक होणार आहे. जोडीदारासोबत चांगले क्षण घालवणार आहात. त्यामुळे परस्पर प्रेम वाढणार आहे. रोमान्सने भरलेला हा आठवडा अनेक आनंदाचे क्षण तुमच्या आयुष्यात आणणार आहे. मात्र आठवड्याच्या शेवटी जरा अस्वस्थ वाटेल. 

11/13

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाने भरलेला असणार आहे. मनं प्रफुल्लित राहणार आहे. लव्ह लाइफसाठी जास्तीत जास्त वेळ तुम्ही देणार आहात. त्यामुळे जोडीदार आनंदी असणार आहे. एकंदरीत हा आठवडा प्रेमाने भरलेला आहे.  

12/13

कुंभ (Aquarius)

या राशीच्या लोकांचे प्रेम जीवन या आठवड्यात चांगल नसणार आहेत. मनं अशांत राहिल त्यामुळे तुम्ही अस्वस्थ राहणार आहात. मात्र आठवड्याच्या शेवटी सकारात्मक गोष्टी होतील. जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालविणार आहात. 

13/13

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. त्यांच्या प्रेम जीवनात सुख-समृद्धीचे योग आल्यामुळे आनंदच आनंद असणार आहे. जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा प्लन करणार आहात. अगदी पार्टी मूडही तुमचा होणार आहे.(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)