Weekly Money Horoscope : हा आठवडा धनवृद्धीसाठी 'या' राशींसाठी शुभ संयोग!

Weekly Money Horoscope 22 to 28 May 2023 : मे महिन्यातील चौथा आठवड्याला सुरुवात होते आहे. हा आठवडा आर्थिकदृष्ट्या तुमच्यासाठी कसा असेल? कोणाचा नशिबात धनलाभ आहे तर कोणाला अधिक खर्च करावा लागेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (Weekly Finance Horoscope)  

| May 21, 2023, 07:56 AM IST

Weekly Money Horoscope 22 to 28 May 2023 : मे महिन्याचा चौथ्या आठवड्याला सुरुवात होतेय. सोमवारी पहिल्याच दिवशी धृति, सर्वार्थ सिद्धि योग, अमृत सिद्धि योग, रवि योग असे चार शुभ संयोग जुळून आले आहेत. प्रत्येकाला चिंता असते येणारा आठवडा (साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य) हा आपल्यासाठी काय घेऊन आला ते जाणून घ्यायची. यासाठी ज्योतिषशास्त्र आपल्याला मदत करतो. (Weekly Finance Horoscope) 

1/13

साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य

या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती आणि करिअरसंदर्भात कसा असेल. काय उतार चढाव असणार आहेत, त्याबद्दल जाणून घ्या.

2/13

मेष (Aries)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. धनलाभाचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही आनंदी आणि शांत असाल. 

3/13

वृषभ (Taurus)

हा आठवडा या राशीच्या लोकांसाठी खर्चिक ठरणार आहे. तुम्ही पार्टी करण्याचा विचार कराल. कुटुंबातील कुठल्या गोष्टीचा निर्णय घेताना समतोल राखा. या आठवड्यात प्रवास टाळा. कामाच्या ठिकाणी समाधानी असाल. 

4/13

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम होईल. नवीन गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. आरोग्याची काळजी घ्या. प्रवास टाळा. आठवड्याच्या शेवटी सुख समृद्धीचे नवीन मार्ग दिसतील. 

5/13

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ ठरणार आहे. त्यांना धनलाभाची शक्यता आहे. गुंतवणुकीतून जबरदस्त फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी मनं प्रसन्न राहिल. मनासारखे काम होणार आहे. आरोग्याकडे जास्त लक्ष देणार आहात. 

6/13

सिंह (Leo)

हा आठवड्या सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. अचानक धनलाभाचे संयोग जुळून आले आहेत. मात्र कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबामध्ये मन उदास असेल. प्रकल्पामध्ये अडचणी येऊ शकतात. आरोग्याकडे विशेष लक्ष देणार आहात.

7/13

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. धनवृद्धीचे शुभ योग जुळून आले आहेत. नवीन गुतंवणुकीतून फायदा होणार आहे. प्रवासातूनही आनंद आणि यश मिळणार आहे. कुटुंबातही सगळे आनंदी असणार आहे. एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी सुख समृद्धी आणि आनंद घेऊन आला आहे. 

8/13

तूळ (Libra)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या अतिशय शुभ असणार आहे. संपत्तीमध्ये वृद्धी होणार आहे. प्रवासातूनही धन लाभाचे संयोग जुळून आले आहेत. प्रकल्पाबाबत आनंदाची बातमी मिळणार आहे. सुख आणि समृद्धी आणि आर्थिक स्थिती मजबूत करणारा हा आठवडा तुमच्यासाठी आनंदादायी असणार आहे. 

9/13

वृश्चिक (Scorpio)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जरा कठीण असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. प्रवास टाळा. भागीदारीतून तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही अडथळे येणार आहेत. मात्र आठवड्याच्या शेवटी परिस्थिती बरी होईल. त्यामुळे तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल.

10/13

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र असणार आहे. कामात तुम्ही फार बिझी असणार आहे. आर्थिक स्थिती ठिकठाक राहिल. अचानक धनलाभाचे योग आहेत. मात्र कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात प्रवास करु नका. प्रकल्पात प्रगती दिसून येईल.आठवड्याच्या शेवटी भविष्यामुळे चिंतेत असणार आहात. 

11/13

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या चांगला असणार आहे. प्रवासातून फायदा होईल. वडिलोपार्जित मालमत्तेतून धनलाभाचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी लक्ष देऊन काम करा. आर्थिक स्थिती मजूबत होणार आहे पण सोबतच पैसा अधिक खर्च होणार आहे. आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न असणार आहे.   

12/13

कुंभ (Aquarius)

या आठवडा या राशीच्या लोकांसाठी अतिशय चांगला असणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. मनासारखे बदल होतील पण वेळ लागणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

13/13

मीन (Pisces)

हा आठवडा मीन राशीच्या लोकासांठी धनलाभाचे योग घेऊन आला आहे. आरोग्याची चिंता मिटणार आहे. कार्यक्षेत्राच्या ठिकाणी भरपूर मेहनत करावी लागणार आहे. येत्या काळात तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही बदल घडू शकतात.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)