Weekly Numerology : 'या' मूलांकासाठी हा आठवडा असेल उत्पन्नाचा, तुमच्या भाग्य काय?

Saptahik Ank jyotish 15 to 21 april 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2 + 4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 15 ते 21 एप्रिल हा आठवडा कसा असेल जाणून घेऊयात. 

Apr 14, 2024, 21:28 PM IST
1/10

Weekly Numerology 15 to 21 april 2024 in Marathi

अंकशास्त्राच्या गणनेनुसार, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ग्रह आणि नक्षत्राचा शुभ संयोग घडणार आहे. सोमवारी 15 एप्रिलला सर्वार्थ सिद्धी योग तर 21 एप्रिलला अमृत सिद्धी योग आणि 17 एप्रिलला महानवमी असणार आहे. त्याशिवाय 17 एप्रिलला रामनवमी असणार आहे. अशा शुभ आठवडा 1 ते 9 मूलांकांसाठी कसा असेल जाणून घ्या 15 ते 21 एप्रिल अंकशास्त्र साप्ताहिक राशीभविष्य अंकशास्त्र डॉ. कविता ओझाकडून 

2/10

मूलांक 1

या आठवड्यात तुम्ही तुमच्या आयुष्यात संयमाने हळूवार पुढे जाणार आहात. कामात वेळ भावनिकदृष्ट्या कठीण असणार आहे. त्यामुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब लागणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. 

3/10

मूलांक 2

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असून आर्थिक लाभाचीही ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत चांगली बातमी मिळणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष टाळलात तर हिताच ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी काही नुकसान होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी अनावश्यक ताण टाळा नाहीतर तुमचं नुकसान होईल. 

4/10

मूलांक 3

या आठवड्यात आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. गुंतवणुकीतून मोठा फायदा तुम्हाला मिळणार आहे. प्रेम संबंधांमध्ये तुम्ही केलेले प्रयत्न तुमच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या शेवटी परिस्थितीत अचानक बदल होणार आहे. तुम्हाला एखादी चांगली संधी मिळणार आहे. 

5/10

मूलांक 4

कामाच्या ठिकाणी यश आणि प्रगती तुमची वाट पाहत आहे. प्रकल्पाबद्दल विचारपूर्वक आणि संयमाने निर्णय घ्या. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे, त्यामुळे परिस्थिती सुधारणार आहे. प्रेम जीवनात रोमान्सची एन्ट्री होणार आहे. जोडीदारासोबत पार्टीच्या मूडमध्ये असणार आहात. कुटुंबात सुख समृद्धी नांदणार आहे.   

6/10

मूलांक 5

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. वडीलधाऱ्या व्यक्तीही पुढे येऊन तुम्हाला मदत करणार आहे. या आठवड्यात खिशाला कात्री लागणार आहे. म्हणून जरा अनावश्यक खर्च टाळा. आठवड्याच्या शेवटी जुन्या आठवणी मन प्रसन्न करेल. कोर्टातील प्रकरण तुमच्या बाजूने लागू शकतो.   

7/10

मूलांक 6

कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार असून तुमच्या मान सन्मानात वाढ होणार आहे. कोणतेही दोन प्रकल्प तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. प्रेम जीवनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चर्चेतून मुद्दा सोडवणे हिताच ठरेल. पैशांबद्दल अतिरेक करण्यापेत्रा थोडं दानधर्म तुम्हाला शांती देईल.   

8/10

मूलांक 7

या आठवड्यात कामाबद्दल जोखीम घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. जोडीदारासोबत प्रेम वाढणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. आठवड्याच्या शेवटी एखादी गोष्ट तुम्हाला चिंतेत टाकणार आहे.   

9/10

मूलांक 8

आर्थिक स्थितीत हा आठवडा शुभ सिद्ध ठरणार आहे. तुम्हाला चोहूबाजूने पैसा मिळणार आहे. अहंकाराचा संघर्ष कामाच्या ठिकाणी अडचणीचा ठरणार आहे. प्रेम जीवनात उलटपालथ होणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एकटेपणा जाणवणार आहे.   

10/10

मूलांक 9

जोडीदारासोबत प्रेम संबंधात मधुरता येणार आहे. प्रेम जीवनात आनंदच आनंद असणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी काही अचडणी येणार आहे. प्रगतीकडे हळूवार वाटचाल करणार आहात. आर्थिक गणित सामान्य असणार आहे. आठवड्याच्या शेवटी कानावर वाईट बातमी तुमचं मन अस्वस्थ करणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)