Monsoon Rain Alert: रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ? जाणून घ्या एका क्लिकवर

Monsoon Rain Alert: रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन अलर्ट म्हणजे नेमकं काय ? हवामान खातं नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करतं?

Jul 28, 2023, 20:22 PM IST

Monsoon Rain Alert: काल राज्यातील सात जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्यामुळे मुंबई, ठाण्यात पावसाची दिवसभर जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. त्यामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं दिसून आलं आहे.

1/5

आजची काय स्थिती?

राज्यात आज कुठंही रेड अलर्ट देण्यात आलेला नाही. ठाण्यासह ७ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर १३ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

2/5

रेड अलर्ट

२०४ मीमी पेक्षा जास्त पाऊस पडल्यावर हा अलर्ट देण्यात येतो. नैसर्गिक आपत्ती ओढावल्यानंतर नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात येतो. यामध्ये लोकांनी स्वतःला आणि इतरांना सुरक्षित ठेवावे, असा या मागील उद्देश असतो.

3/5

ऑरेंज अलर्ट

११५ ते २०४ मीमी पाऊस होण्याची शक्यता असल्यास हा अलर्ट दिला जातो. नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून हा अलर्ट जारी करण्यात येतो.

4/5

येलो अलर्ट

६५ ते ११५ मीमी पाऊस होण्याची शक्यता असल्यास हा अलर्ट दिला जातो.  पुढील काही दिवसांमध्ये हवामानाच्या बदलामुळे संकट ओढवू शकते, त्यामुळे सावधगिरी बाळगण्यासाठी हा अलर्ट जारी करण्यात येतो.

5/5

ग्रीन अलर्ट

६५ मीमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याच हवामान खात्याकडून हा अलर्ट दिला जातो. हवामान विभागाकडून अनेकदा हा अलर्ट जारी केला जातो. यांचा अर्थ संबंधित ठिकाणी कुठलाही धोका नाही. सर्व काही ठीक आहे.