जगातील सर्वात मोठी Hummer कार; साईज पाहूनच डोळे विस्फारतील

 शेख हमद बिन हमदान अल नाहयान हे Hummer H1 X3 चे मालक रेनबो शेख म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांनीच जगातील सर्वात मोठ्या Hummer कारचे फोटो शेअर केले आहेत.

Jul 28, 2023, 20:22 PM IST

Biggest Hummer In The World : मर्सिडिज,  बीएमडब्ल्यू, रेंज रोवर, जॅगुआर, ऑडी या आलिशान कारच्या यादीत Hummer SUV कारचे नाव देखील घेतले जाते. दुबईत या कारची विशेष क्रेज पहायला मिळते. दुबईतील शेख हे लक्झरी लाइफ-स्टाइलमुळे चर्चेत असतात. दुबईतील एका शेखने जगातील सर्वात मोठ्या Hummer कार चे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या कारची साईज पाहूनच डोळे विस्फारतील. एखाद्या कार्गो वाहनाप्रमाणे महाकाय आकाराची ही कार आहे. 

 

1/6

Hummer ची H1 SUV आहे जी UAE मध्ये तयार करण्यात आली आहे.

2/6

अमेरिकन सैन्यात वापरल्या जाणार्‍या हमर्सच्या कारचे टायर वापरण्यात आले आहेत.

3/6

Hummer H1 X3 ही कार 14 मीटर लांब आणि 6 मीटर रुंद आहे. 

4/6

ही कार स्टँडर्ड हमरपेक्षा 3 पटीने मोठी आहे. 

5/6

आकाराने मोठी साईज आणि दमदार इंजिनमुळे ही कार जगातील सर्वात पावरफुल कार मानली जात आहे. 

6/6

ही जगातील  सर्वात मोठी Hummer कार असल्याचा दावा करण्यात आला आहे.