ऐश्वर्या रायला तोडीस तोड ठरलेल्या अभिनेत्रीनं का घेतला संन्यास; दुर्गम भागांमध्ये ध्यानधानरणा करताना दिसली आणि...

Entartainment News : साध्वीरुपात ती समोर आली आणि अनेकांनी तिला ओळखलंही नाही. अभिनेत्रीनं का निवडला असावा हा मार्ग? जाणून घ्या आणि पाहा तिचे काही भुवया उंचावणारे फोटो   

Aug 07, 2024, 08:58 AM IST

Entartainment News : कलाविश्वात येणाऱ्या प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला यश येतंच असं नाही. किंबगुना काही कलाकार अपयशाचा सामना करून अखेर या विश्वातून काढता पायही घेतात. एका अभिनेत्रीनंही असंच केलं. 

 

1/7

ऐश्वर्या सुष्मिताला टक्कर

What happened to actress Barkha Madan as she turned monk

Entartainment News : सेलिब्रिटींच्या यशाची कहाणी, त्यांच्या वाट्याला येणारा संघर्ष या साऱ्याविषयी अनेकदा अनेक गोष्टी ऐकल्या, वाचल्या असतील. पण, एका अभिनेत्रीविषयी वाचून सध्या अनेकांना धक्का बसत आहे. ही अभिनेत्री इतकी सुंदर होती, की मिस इंडिया स्पर्धेदरम्यान तिनं ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन यांनाही टक्कर दिली होती. 

2/7

चित्रपट

What happened to actress Barkha Madan as she turned monk

खिलाडी कुमार म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या या अभिनेत्रीनं एकाएकी कलाविश्वातून काढता पाय घेतला आणि ती अध्यात्मिकतेकडे वळली. पाहता पाहता तिनं अनेक गोष्टींचा त्यात गेला. ही अभिनेत्री आहे बरखा मदान.   

3/7

सौंदर्यस्पर्धा

What happened to actress Barkha Madan as she turned monk

1994 मध्ये सुष्मिता सेननं मिस इंडियाचा बहुमान मिळवला आणि या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिली. तिसरं स्थान होतं बरखा मदानचं. त्यावेळी मिस टुरिझम या पुरस्कारानं तिचा गौरव करण्यात आला होता. पुढे 1996 मध्ये बरखानं  'खिलाड़ियों का खिलाड़ी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर केली.   

4/7

कारकिर्द

What happened to actress Barkha Madan as she turned monk

'भूत', 'समय', 'तेरा मेरा प्यार', 'सोच लो' आणि 'सरखाब' अशा चित्रपटांमध्ये ती झळकली. 'सात फेरे', 'न्याय', 'सुराग', 'नव्य' आणि 'घर एक सपना' अशा मालिकांमधून तिनं मालिका विश्वातही नशीब आजमावलं.   

5/7

निर्णय

What happened to actress Barkha Madan as she turned monk

2012 मध्ये बरखानं सर्वात मोठा निर्मय घेत अनेकांनाच हादरा दिला. हे तेच वर्ष होतं जेव्हा तिनं बौद्ध धर्म स्वीकारला आणि ती या धर्माच्या वाटेवर चालू लागली. दलाई लामा यांची अनुयायी म्हणून तिनं आयुष्य जगण्यास सुरुवात केली. 

6/7

साध्वी

What happened to actress Barkha Madan as she turned monk

बरखा हिमाचल प्रदेशातील धरमशाला इथं अनेकदा वावरताना दिसते. ती एचआयव्ही बाधित मुलांना मदत करणाऱ्या बौद्ध गयाच्या तारा चिल्ड्रन प्रोजेक्टमध्येही योगदान देते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सध्या नेमकं कसं जीवन जगते याची झलक पाहायला मिळते. बरखा सध्या मठात वास्तव्यास आहे. सोशल मीडियावरही ती तिचा हा प्रवास सातत्यानं शेअर करत असते. ग्लॅमर जगतापासून कैक मैल दूर असणारी बरखा सध्या साध्वीरुपात आणि त्याच पद्धतीच्या पेहरावात दिसते.   

7/7

काही गोष्टी मागे राहिल्या...

What happened to actress Barkha Madan as she turned monk

असं म्हटलं जातं की, बरखानं 2002 नंतरच अध्यात्माकडे वळण्यास सुरूवात केली होती. त्यावेळी हिमाचलमधील धरमशाला इथं पार पडलेल्या एका कार्यक्रमात तिची भेट दलाई लामा जोपा रिंपोचे यांच्याशी झाली होती. बरखानं लामांची मतं आणि विचार ऐकले आणि भिक्षू बनण्याच्या विचारानं तिच्या मनात घर केलं. खुद्द बरखानंच आपल्या या निर्णयाबाबत सांगताना म्हटलेलं, 'जीवनात सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण, काही गोष्टी मागे राहिल्या आहेत. निसटत आहेत असं वाटलं'.