लाडली बहना योजना महाराष्ट्रातही? महिलांच्या खात्यात येतात पैसे; काय आहे नक्की?

Ladli Behna Yojana: योजनेअंतर्गत एकूण 1 कोटी 25 लाख 33 हजार 145 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 कोटी 25 लाख 5 हजार 947 महिला पात्र ठरल्या.

| Dec 05, 2023, 12:05 PM IST

Ladli Behna Yojana: महिला तसेच त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारणे हा लाडली बहना योजनेचा उद्देश आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना सुरू केली होती. ज्याचा आतापर्यंत सुमारे 1.25 कोटी महिलांना फायदा झाला आहे.

1/10

लाडली बहना योजना महाराष्ट्रातही? महिलांच्या खात्यात येतात पैसे; काय आहे नक्की?

Ladli Behna Yojana Benifits

Ladli Behna Yojana: लाडली बहना योजनेचा थेट फायदा मध्य प्रदेशातील लाखो महिलांना झाला आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना आर्थिक सुरक्षा दिली जाते.

2/10

शिवराज सिंह चौहान यांनी केली सुरुवात

Ladli Behna Yojana Benifits

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना सुरू केली होती. ज्याचा आतापर्यंत सुमारे 1.25 कोटी महिलांना फायदा झाला आहे.या योजनेमुळे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार सत्तेत आले असे म्हणतात. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकार आता महाराष्ट्रात ही योजना राबविणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

3/10

योजनेचा उद्देश

Ladli Behna Yojana Benifits

राज्यातील महिलांचे आरोग्य सुधारणे हा त्याचा उद्देश आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेचा वापर महिला त्यांचे आणि त्यांच्या मुलांचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.

4/10

पात्र महिला

Ladli Behna Yojana Benifits

 योजनेअंतर्गत एकूण 1 कोटी 25 लाख 33 हजार 145 महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी 1 कोटी 25 लाख 5 हजार 947 महिला पात्र ठरल्या.

5/10

योजनेचे वैशिष्ट्य

Ladli Behna Yojana Benifits

या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जातात. याचा अर्थ प्रत्येक महिलेला वर्षभरात 12 हजार रुपये मदत म्हणून दिले जातात. यासाठी सरकार दरवर्षी 12 हजार कोटी रुपयांची बजेटमध्ये तरतूद करत आहे.

6/10

वयोमर्यादा

Ladli Behna Yojana Benifits

यापूर्वी यासाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 23 वर्षे ठेवण्यात आली होती. परंतु नंतर ती 21 वर्षे करण्यात आली आहे. योजनेंतर्गत 21 वर्षे ते 60 वयोगटातील महिला अर्ज करू शकतात.

7/10

योजनेचे लाभार्थी कोण?

Ladli Behna Yojana Benifits

मध्य प्रदेशात सुरू असलेल्या या योजनेचा लाभ सर्व श्रेणीतील महिलांना दिला जात आहे. सर्वसाधारण प्रवर्ग, मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक, विधवा यांनाही या योजनेंतर्गत लाभार्थी बनवण्यात आले आहे. 

8/10

पात्रता काय ?

Ladli Behna Yojana Benifits

लाडली बहना योजनेसाठी लाभार्थी मध्य प्रदेशचा रहिवासी असावा हे सर्वात महत्त्वाचे आहे. यासाठी महिला मध्य प्रदेशची कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. शाळा किंवा महाविद्यालयात शिकणाऱ्या मुली किंवा महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

9/10

आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला

Ladli Behna Yojana Benifits

महिलांची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन ही योजना खास बनवण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांनाच यामध्ये लाभ दिला जातो.

10/10

आवश्यक कागदपत्रे

Ladli Behna Yojana Benifits

लाडली बहना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, फोटो, बँक खात्याचा तपशील, मोबाईल क्रमांक आणि मूळ रहिवासी प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेची पडताळणी करण्यासाठी, जन्म प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल.