Driving License हरवले तर काय करावे? हे सोपे उपाय करा आणि मिळवा तुमचे लायसन्स

 तुम्ही वाहन चालवत असाल आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License ) नसेल तर तुमच्यावर प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) दंडात्मक कारवाई करतात. त्यामुळे वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स महत्वाचे आहे.

| Jun 24, 2023, 09:56 AM IST

Driving License : कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे परवाना असला पाहिजे. देशात वाहन चालवण्यासाठी अनेक नियम बनवण्यात आले आहेत. जर तुम्हीही वाहन चालवत असाल तर तुमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना (Driving License ) असणे आवश्यक आहे. म्हणजेच कोणतेही वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स गरजेचे आहे. जर तुमचे Driving License  हरवले तर?

1/6

ड्रायव्हिंग लायसन्स हे 18 वर्षांवरील किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांसाठी बनवले जाते. 18 वर्षांखालील व्यक्तींना वाहन चालवण्यास परवानगी नाही. तसेच जर असे केल्यास तुमच्याकडून दंड आकारला जातो आणि जेलही होऊ शकते.

2/6

देशात 18 वर्षांवरीलच प्रौढाला वाहन चालण्याची परवानगी दिली गेली आहे. जर तुमचेही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License ) हरवले असेल तर काळजी करु नका. कारण ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यानंतर काही सोपे पर्याय आहेत त्याचा वापर तुम्ही करु शकता.

3/6

डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स कसे बनवायचे? जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले तर तुम्ही सहज डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स बनवू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला हरवलेल्या ड्रायव्हिंग लायसन्सची एफआयआर पोलीस ठाण्यात द्यावी लागेल.

4/6

तसेच तुम्ही केलेल्या एफआयआरची प्रत घ्या आणि या एफआयआर प्रतद्वारे तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करु शकता. यानंतर तुम्हाला आरटीओकडून डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल. त्यासाठी काही शुल्क भरावे लागेल.

5/6

डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करु शकता. प्रथम परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा. या वेबसाइटवर विचारलेल्या सर्व तपशीलांसह एलएलडी फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर, या फॉर्मची प्रिंट आउट घ्या आणि त्यासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा आणि शुल्क देखील ऑनलाइन भरा.

6/6

आरटीओ कार्यालयात फॉर्म सबमिट करा आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला डुप्लिकेट Driving License मिळेल. तसेच तुम्ही आरटीओ कार्यालयात जाऊनही फॉर्म भरु शकता. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्सला अर्ज करायचा नसेल तर तुम्ही आरटीओ कार्यालयात जाऊन देखील अर्ज करता येतो. या ठिकाणी जाऊन तुम्हाला LLD फॉर्म भरावा लागेल तसेच त्यासोबत फी देखील जमा करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला 30 दिवसांमध्ये डुप्लिकेट लायसन्स दिले जाईल.