...अन्यथा तुमचं Whatsapp होणार बंद, ही शेवटची तारीख

Whatsapp च्या प्रायव्हसी पॉलिसीवरून गेल्या काही दिवसांत तुफान वाद सुरू झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा Whatsapp कडून Privacy Policy अपडेट करण्यात आल्या आहेत. bgr.in या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार नव्या पॉलिसी मंजूर करण्यासाठी शेवटची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. 

Mar 07, 2021, 12:54 PM IST
1/5

whatsapp चं नवीन धोरण

whatsapp चं नवीन धोरण

फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअॅपने पुन्हा एकदा आपले गोपनीयता धोरण तयार केले आहे. नवीन धोरणाची संपूर्ण मार्गदर्शक तत्त्वे लवकरच प्रसिद्ध केली जातील. मागील वादाचा विचार करता वेळी पूर्ण काळजी घेतली असल्याचं कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 

2/5

नव्या धोरणात काय असेल?

नव्या धोरणात काय असेल?

या नव्या धोरणात युझर्सला सामाधानी करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. युझर्सची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्याचं आश्वासनही कंपनीकडून देण्यात आलं आहे. वापरकर्त्याची परवानगी घेतल्याशिवाय त्याचा डेटा कोणालाही देण्याचा प्रश्न येणार नाही. तसेच सर्व चॅट्स एनस्क्रिप्ट स्वरूपात आहेत त्यामुळे कोणतीही तिसरी व्यक्ती किंवा पार्टी ते पाहू शकत नाही. 

3/5

जुन्या धोरणावरून विवाद

जुन्या धोरणावरून विवाद

जानेवारीत आलेल्या व्हॉट्सएपच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोन मॉडेल, लोकेशन माहिती, फेसबुकच्या मालकीच्या कंपन्या मेसेंजर, इन्स्टाग्राम आणि थर्ड पार्टीसह वैयक्तिक माहिती सामायिक करण्यासह वापरकर्त्याच्या डेटावर चर्चा झाली. बदलेल्या धोराणावरून खूप वादही झाले होते.

4/5

15 मे शेवटची तारीख

15 मे शेवटची तारीख

Whatsapp कंपनीने प्रायव्हसी पॉलिसी मंजूर करण्यासाठी शेवटची तारीखही दिली आहे. 15 मेपर्यंत युझर्सनी जर हे धोरण मंजूर केलं नाही तर त्यांचं Whatsapp बंद होणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात येत आहे.   

5/5

बंद होऊ शकते सेवा

बंद होऊ शकते सेवा

नवीन पॉलिसी मंजूर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने पूर्ण वेळ दिला आहे जेणेकरुन वापरकर्त्यांना नवीन अपडेटेड पॉलिसी नीट समजू शकेल आणि मंजूर केली जाऊ शकेल. जर वापरकर्त्याने धोरणावर सहमत नसेल तर त्याच्या व्हॉट्सअ‍ॅप सेवेवर मर्यादा येतील. कोणत्या सेवा मर्यादित असतील याविषयी कंपनीकडून कोणतेही निवेदन देण्यात आले नाही.