WhatsApp Spam Calls मुळे तुम्हालाही होतोय त्रास? कशी मिळवाल सुटका, जाणून घ्या...

WhatsApp Spam Calls: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन व्हॉटस्अप स्पॅम कॉल्स येत असल्याचे समोर आले आहेत. अनेक युजर्सनी याबाबतच तक्रारही केली आहे. याचपार्श्वभूमीवर Truecaller ने एक मोठी घोषणा केली असून लवकरच Truecaller अॅप वापरकर्त्यांना WhatsApp वर देखील स्पॅम संरक्षण मिळेल. युजर्सना हे फीचर मोफत मिळणार आहे.

May 15, 2023, 16:32 PM IST
1/8

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून कॉलिंगचे स्कॅमचे प्रकारही वाढले आहेत. यामध्ये आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. अचानक अनेक आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून कॉल येत आहेत.

2/8

हे कॉल्स इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) आणि इतर यांसारख्या विविध देशांचे कॉल आहेत. दरम्यान या कॉल्सचा तुम्हाला त्रास होत असले तर अनेक युजर्सना कंपनीने या नंबर्सना ब्लॉक करून तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

3/8

गेले काही दिवसांपासून या आंतरराष्ट्रीय कॉल्समुळे सगळेच अडचणीत आले आहेत. विविध वापरकर्ते ट्विटर आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध तक्रारी करतात. त्या व्हॉट्सअॅपवरही अनेक तक्रारी आहेत. 

4/8

याबाबत मार्क झुकरबर्ग म्हणाले की, व्हॉट्सअॅपवर तुमची वैयक्तिक माहिती केवळ तुमच्या संपर्कांतील लोकांसाठीच व्हिजीबल ठेवा.  अनोळखी व्यक्तींना आपली खाजगी माहिती डिस्प्ले होऊ देऊ नका, असे मार्क यांनी म्हटले आहे.   

5/8

गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपमध्ये नवीन फीचर्स येत आहेत. काही महिन्यांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर येणार आहे, ज्यामुळे व्हॉट्सअॅप अनोळखी नंबरवरुन आलेला फोन आपोआप सायलेंट होणार होता. 

6/8

आता लवकरच हे फीचर कंपनी आणणार आहे. व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचर्सची माहिती देणाऱ्या WABetainfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी हे फीचर Android 2.23.10.7 अपडेटसह आणणार आहे. 

7/8

याच्या मदतीने अनोळखी नंबरवरून येणारा फोन सायलेंट करू शकतो. अनोळखी नंबरला सायलेंट करण्यासाठीची सेटिंग व्हॉट्सअॅपच्या सेटिंगमध्ये प्रायव्हसी ऑप्शनमध्ये केली जाईल.   

8/8

फोन सायलेंट झाल्यानंतर जाणून घेण्यासाठी हा नंबर नोटिफिकेशन आणि कॉल लॉगमध्ये नक्कीच दिसेल.