नववर्ष 2023 मध्ये WhatsApp मध्ये होणार बदल, कॉल रेकॉर्डिंगपासून मिळणार इतर सुविधा

WhatsApp Upcoming Feature 2023: व्हॉट्सअ‍ॅप जगभरात सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून संवाद साधणं सोपं असल्याने व्हॉट्सअ‍ॅपला पसंती दिली जाते. युजर्स प्रतिसाद पाहता व्हॉट्सअॅप नवनवीन फीचर्स आणते. 2023 या वर्षात काही धमाकेदार फीचर्स येणार आहे. यामध्ये कॉल रेकॉर्डिंग, मेसेज एडिट यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. 

Dec 14, 2022, 12:54 PM IST
1/5

Whatsapp

कॉल रेकॉर्डिंग फीचर्सबाबत उत्सुकता ताणली गेली आहे. समोरची व्यक्ती कॉल रेकॉर्ड करते हे कळणार देखील नाही. येत्या वर्षभरात व्हॉट्सअ‍ॅप फीचर आणेल अशी अपेक्षा आहे. अ‍ॅप युजर्संना कॉल रेकॉर्डिंग फीचर डिसेबल करण्यास अनुमती देईल. लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटसबाबत करता येतं. 

2/5

Whatsapp

व्हॉट्सअ‍ॅप युजर्संना मेसेज ऑटो-डिलीट आणि डिलीट करण्याची परवानगी देते. परंतु मेसेज एडिट करण्याचा पर्याय नाही. येत्या वर्षभरात एडिट मेसेज फीचर येऊ शकते. यामुळे यूजर्सना ऑटो डिलीट, डिलीट मेसेज तसेच मेसेज एडिट करण्याची सुविधा मिळणार आहे. पण मेसेज पाठवल्यानंतर 5 मिनिटांनी हे फीचर काम करणार नाही.

3/5

Whatsapp

युजर्संना ऑटो-डिलीट फीचर मिळते. पण मेसेज शेड्यूल करण्याचा कोणताही पर्याय नाही. जे लोक ऑफिसच्या कामासाठी अ‍ॅप वापरतात किंवा जे जास्त अ‍ॅक्टिव्ह असतात त्यांच्यासाठी हे फिचर खूप उपयुक्त ठरेल.

4/5

Whatsapp

सध्या युजर्संना मेसेज डिलीट करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. पण मेसेज डिलीट केल्यावर समोरच्या व्यक्तीने मेसेज पाठवून डिलीट केल्याचे समजतं. नवीन फीचरमुळे युजरने मेसेज अनसेंड करताच समोरच्या व्यक्तीच्या चॅटमधून मेसेज गायब होईल.

5/5

Whatsapp

व्हॉट्सअ‍ॅप व्हॅनिश मोड फीचर इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजरवरून घेतले जाऊ शकते. या फीचरमधील संभाषणानंतर संपूर्ण चॅट डिलीट केले जाते. हे चॅटचे स्क्रीनशॉट घेणे टाळू शकते. हे वैशिष्ट्य लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.