यापेक्षा स्वस्त कार कुठेच नाही, 3.50 ते 5 लाखांमध्ये 'ही' कार आहे मस्त

जर तुम्ही देखील संपूर्ण कुटुंबासाठी जुनी कार खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाचा सविस्तर

| Jul 28, 2024, 16:52 PM IST
1/6

नवनवीन फीचर्स

सध्या कार खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. नवनवीन फीचर्स असलेल्या कार सातत्याने लाँच होत आहेत. मात्र, ग्राहक त्यांच्या गरजेनुसार कारची निवड करतात. 

2/6

सेकंड हँड कार

मात्र, आता सेकंड हँड कार घेण्यासाठी नागरिक देखील गर्दी करत असतात.  सेकंड हँड कार या तुम्हाला निम्म्या किमतीत खरेदी करता येतात.

3/6

अनेक वेबसाईट

नवीन कार खरेदी करणं सध्या सोपं राहिलेले नाही. म्हणून काही लोक जुनी कार खरेदी करत असतात. यासाठी अनेक वेबसाईट देखील आहेत. 

4/6

मॅन्युअल कार

एका वेबसाइटवर 2012 ची 56,000 किलोमीटर धावलेली मारुती अर्टिगा व्हीएक्सआय उपलब्ध आहे. मॅन्युअल आणि फर्स्ट ओनर मॉडेल कार आहे.

5/6

मारुती अर्टिगाची किंमत

या मारुती अर्टिगाची किंमत 3.40 लाख रुपये आहे. नवीन अर्टिगाची किंमत 7.72 लाखांपासून सुरू होते. या कारचं रजिस्ट्रेशन दिल्लीचं असून, ती डार्क ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे.

6/6

कोणती काळजी घ्याल

जुनी कार विकत घेताना कारची आरसी बुक, नोंदणी, विम्याची कागदपत्रं या शिवाय गाडीचे इंजिन, टायर इतर सर्व गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या.