Restaurant मधलं खायचंय पण, बिलावरचं GST पाहून धडकी भरते? वापरा ही ट्रीक

Food Bills : मुळात हॉटेलात खायचा बेत आखताना सर्वांचाच उत्साह असतो. पण, हातात जेव्हा बिल पडतं तेव्हा त्यावर लावलेले कर, सर्व्हिस चार्ज वगैरे गोष्टी जोडून मोठा झालेला आकडा मात्र धडकी भरवतो. 

Jun 24, 2023, 09:35 AM IST

Restaurant Food: चांगलंचुंगलं खायला कोणाला आवडत नाही? पण, जेव्हा दोनशे रुपये जीएसटी म्हणून आकारले जातात तेव्हा मात्र सगळी भूकच पळते.

1/7

घरचं जेवण जेवून कंटाळा आला?

which Restaurant cant ask for gst on Food bills

रोजरोज घरचं जेवण जेवून कंटाळा आला की, बऱ्याचदा अनेकजण हॉटेलात जाऊन तयार जेवणावर ताव मारायचा बेत आखतात.   

2/7

रेस्तराँ

which Restaurant cant ask for gst on Food bills

टेबलावर येणारे चमचमीत पदार्थ, त्यांच्या चवी हे सारंकाही हवंहवंसं वाटतं.  पण, जेवण उरकल्यानंतर बिलाच्या रकमेत पदार्थांच्या दरांसोबतच जोडला जाणारा जीएसटी मात्र सारी चव बिघडवतो. 

3/7

सर्व रेस्तराँ जीएसटी आकारत नाहीत.

which Restaurant cant ask for gst on Food bills

तुम्हाला एक गोष्ट माहितीये का, सरकारनं GST चं धोरण लागू केलंय खरं. पण, सरसरकट सर्वच रेस्तराँ तो आकारू शकत नाहीत. परिणामी इथं तुमचे पैसे हमखास वाचणार.   

4/7

केंद्राचं धोरण

which Restaurant cant ask for gst on Food bills

हे रेस्तराँ जीएसटी आकारू शकत नाहीत कारण ते या धोरणाचा भाग नाहीत. जीएसटी कॉम्‍पोजिशन अंतर्गत हॉटेल मालकांना वार्षिक कमाईवर कर भरावा लागतो. हा जीएसटी सामन्य दराहून कमीच असतो.   

5/7

जीएसटी

which Restaurant cant ask for gst on Food bills

1.5 कोटींहून कमी टर्नओवर असणारा एखादा लघु व्यावसायिक या योजनेचा फायदा घेऊ शकतो. म्हणजेच जीएसटी कॉम्‍पोजिशन स्‍कीमचा फायदा घेणारे रेस्तराँ जीएसटी आकारू शकत नाहीत   

6/7

लक्षात ठेवा

which Restaurant cant ask for gst on Food bills

त्यामुळं इथून पुढं जेवणासाठी एखाद्या रेस्तराँमध्ये जाणार असाल तर एक बाब लक्षात घ्या की ते ठिकाण जीएसटी कॉम्‍पोजिशन स्‍कीमच्या अख्त्यारित येतंय की नाही. 

7/7

Composition taxable person

which Restaurant cant ask for gst on Food bills

किंबहुना अशा सर्व रेस्तराँनी त्यांच्या बिलांवर “Composition taxable person, not eligible to collect tax on supplies” असं नमूद करणं अपेक्षित आहे. ही ओळ असल्यास तुम्ही जीएसटी भरणं अपेक्षित नाही हे कायम लक्षात ठेवा.