Modi In US: मोदींसाठी Whitehouse मध्ये खास Dinner; Menu मधील पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

PM Modi US dinner menu : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहे. पंतप्रधानाच्या या अमेरिका दौऱ्याकडे भारत-अमेरिका संबंधातील एक ऐतिहासिक क्षण म्हणून पाहिलं जातयं. मोदींचा या अमेरिका दौऱ्यात विशेष सन्मान करण्यात येणार आहे. प्रायव्हेट डिनर ते व्हाइट हाउस पार्कमध्ये मोदींचे भव्य स्वागत करण्यात येईल. 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा हा 6 वा अमेरिका दौरा आहे. यानिमित्ताने अमेरिकेतील न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटमध्ये भारतीय खाद्यपदार्थांचा समावेश असलेली खास थाली पंतप्रधान मोदींना सादरे केली जाणार आहे.

Jun 20, 2023, 13:52 PM IST
1/6

मोदींसाठी कोणते खास पदार्थ असणार?

PM Modi US dinner menu

अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत न्यू जर्सी (Pm Narendra Modi Visit In New Jersey) राजकीय मेजवाणीसाठी जाणार आहेत. 22 जूनच्या रात्री ही मेजवाणी होणार असून नरेंद्र मोदींसाठी न्यू जर्सी येथील रेस्टॉरंटमध्ये कोणते खास पदार्थ असणार आहेत ते जाणून घेऊया...

2/6

पंतप्रधानांचे आवडते पदार्थ

PM Modi US dinner menu

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी न्यू जर्सी येथील एका रेस्टॉरंटमध्ये मोदीजी थाळीचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. मोदीजी थाळीमध्ये भारतीय पदार्थांचा समावेश असून मोदींच्या आवडती डिश खिचडीचाही समावेश असणार आहे. याशिवाय सरसों का साग, रसगुल्ला, दम आलू ते इडली, ढोकळा, चास आणि पापड यासारख्या काश्मिरी पदार्थांचा समावेश आहे. 

3/6

मोदींना खिचडी प्रिय

PM Modi US dinner menu

रिपोर्ट्सनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजराती जेवण खूप आवडते. याशिवाय त्यांना खिचडी खायलाही आवडते. पीएम मोदी भारतीय खाद्यपदार्थांचे चाहते आहेत. याआधी पीएम मोदींनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते बोट चोखा खाताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्यांना हंगामी फळे, मशरूम, सरसों का साग आणि हिरव्या भाज्या खायला आवडतात.

4/6

'मोदीजी थाली'

PM Modi US dinner menu

याचपार्श्वभूमीवर न्यू जर्सीतील एका हॉटेलने 'मोदीजी थाली' तयार केली आहे. या प्लेटचे लवकरच अनावरण करण्यात येणार असून हॉटेलचे मराठी मालक आणि शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी प्लेट तयार केली आहे. 

5/6

प्लेट मेन्यूची वैशिष्ट्ये

PM Modi US dinner menu

यामध्ये प्लेट मेन्यूची वैशिष्ट्ये पाहून तुम्हाला भारतीय विविधता किंवा प्लेटवरील वस्तू दिसतील. खिचडी, कोथिंबीर वडी, रसगुल्ला, सरसो दा साग, दम आलू काश्मिरी, इडली, ढोकळा, टाक आणि पापड यांचा समावेश आहे. 

6/6

मोदीजींची खास थाळी

PM Modi US dinner menu

हॉटेलचे मराठी मालक तथा शेफ श्रीपाद कुलकर्णी यांनी ही थाळी तयार केली असून ‘भारतीय समुदायाच्या मागणीनुसार आम्ही मोदीजींची खास थाळी बनवली आहे. या थाळीमध्ये खिचडी, रसगुल्ला, सरसो का साग, दम आलू सब्जी, इडली, कोथिंबीर वडी, ढोकळा, ताक, पापड इत्यादी व्यंजने असणार आहेत.