Blood Donation: कोणी आणि कधी करू नये रक्तदान? 'या' समस्यांचा करावा लागेल सामना

Blood Donation: रक्तदान करणं हे एक महान काम मानलं जातं. परंतु ते करताना प्रत्येकाल त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते. जर तुम्ही यापैकी कोणत्याही परिस्थितीत असाल तर रक्तदान करण्यापूर्वी कोणती काळजी घेतली पाहिजे, याकडे लक्ष द्यावं.

| Jul 23, 2024, 20:03 PM IST
1/7

रक्तदान हे एक उदात्त काम असून ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. असे काही लोक आहेत ज्यांनी रक्तदान करू नये, कारण त्याचा त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. 

2/7

अशातच रक्तदान कोणी आणि कधी करू नये हे जाणून घेतलं पाहिजे.

3/7

किशोरवयीन मुलं- 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांनी रक्तदान करू नये. त्यांचे शरीर अजूनही विकसित होत असतं. अशावेळी रक्तदान केल्याने ते अशक्त होऊ शकतात.

4/7

कमी वजनाचे लोक- जर तुमचं वजन 50 किलोपेक्षा कमी असणार आहे, तर तुमच्यासाठी रक्तदान करणे सुरक्षित नाही. 

5/7

तुमचे वजन कमी असल्यास रक्तदान केल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

6/7

गर्भवती महिला- गर्भवती महिलांनी रक्तदान करू नये. यामुळे त्यांचं आणि त्यांच्या मुलाचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.

7/7

शस्त्रक्रिया झालेले किंवा गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्ती- जर तुमचं नुकतीच कोणती सर्जरी झाली असेल किंवा कोणत्याही गंभीर आजारातून बरे झाले असाल तर तुम्ही रक्तदान करू नये.