1/5
हे आहेत मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे आयुक्त इक्बाल चहल
राज्य शासनातर्फे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी इक्बाल सिंग चहल यांची नियुक्ती केल्यानंतर सोशल मीडिया, राजकीय वर्तुळ ते अगदी इतरही क्षेत्रांमध्ये त्यांच्याविषयीच्या बऱ्याच चर्चा पाहायला मिळाल्या. नव्या आयुक्यांविषयी जाणून घेण्यासाठीही काहींनी कुतूहल व्यक्त केलं. चला तर मग, या आयुक्तांच्या कारकिर्दीचा घेतलेला हा धावता आढावा पाहूया...
2/5
हे आहेत मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे आयुक्त इक्बाल चहल
२० जानेवारी १९६६ रोजी जन्मलेल्या इक्बाल सिंग चहल यांनी १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेत ९६ टक्के गुणांसह राष्ट्रीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले होते. इलेक्ट्रॉनिक्स एण्ड इलेक्ट्रीकल कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विषयात बी. टेक. (ऑनर) ही पदवी संपादीत केल्यानंतर त्यांनी १९८९ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश संपादन करुन सनदी सेवेमध्ये महाराष्ट्र तुकडीत प्रवेश केला. जवळपास ३१ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या चहल यांनी नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, औरंगाबाद विभागाचे अतिरिक्त आयुक्त, औरंगाबादचे जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हाधिकारी, पर्यावरण विभागाचे सहसचिव, धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव या पदांचा पदभार सांभाळला
3/5
हे आहेत मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे आयुक्त इक्बाल चहल
4/5