EXCLUSIVE : अभिनेता अक्षय वाघमारेचं 'डॅडी'च्या मुलीशी लॉकडाऊन लग्न
लॉकडाऊनमध्ये पार पडला सोहळा
दक्षता ठसाळे, झी मीडिया, मुंबई : अभिनेता अक्षय वाघमारे आणि अरूण गवळी याची कन्या योगिताचा आज अतिशय खासगी पद्धतीने लग्नसोहळा संपन्न झाला. अतिशय खासगी पद्धतीने आणि लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत हे दोघं लग्नबंधनात अडकले. २०१९ डिसेंबरमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर २९ मार्च रोजी लोअर परेलच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अतिशय धुमधडाक्यात हे लग्न होणार होतं. मात्र लॉकडाऊनमुळे हे लग्न पुढे ढकलण्यात आलं.
मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता दोन वेळा लॉकडाऊन वाढवण्यात आलं. यामुळे या दोघांच लग्न अतिशय खासगी पद्धतीने आज ८ मे रोजी शुक्रवारी दगडी चाळीत संपन्न झालं. या लग्नाकरता अक्षयच्या आई-वडिलांना पुण्यातून मुंबईत परवानगी घेऊन आणण्यात आलं. अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या लग्नाचे फोटो ऍरो मल्टीमीडियाच्या ओमकार शिंदे यांनी टिपले आहेत. या लग्नाचे EXCLUSIVE फोटो झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी खास