Nirmala Sitharaman Daughter Marriage: निर्मला सीतारमण यांचा जावई कोण आहे? नरेंद्र मोदींशी आहे संबंध

Who is Nirmala Sitharamans Son in Law: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांची मुलगी परकला वांगमयी (vangmayi parakala) यांची मुलगी विवाहबंधनात अडकली आहे. काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. दरम्यान यानंतर निर्मला सीतारमण यांचा जावई नेमका कोण आहे अशी चर्चा रंगली आहे.    

Jun 09, 2023, 17:31 PM IST
1/7

Who is Nirmala Sitharamans Son in Law: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांची मुलगी परकला वांगमयी (parakala vangmayi) विवाहबंधनात अडकली आहे. गुजरातच्या प्रतिक दोशी याच्याशी तिचं लग्न झालं आहे. कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने बंगळुरुत हे लग्न पार पडलं.   

2/7

निर्मला सीतारमण लग्नात सर्व विधींसाठी उपस्थित होत्या. लग्नात जवळचे नातेवाईक आणि राजकीय नेते उपस्थित होते.   

3/7

वांगमयी पत्रकार असून प्रतिक दोशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास अधिकारी आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या रिसर्च अॅण्ड स्ट्रॅटेजी विंगमध्ये तो काम करतो.   

4/7

20 मे 1991 रोजी परकला वांगमयीचा जन्म झाला. तिचे वडील परकला प्रभाकर राजकारणी आणि सामाजिक भाष्यकार आहेत. त्यांनी संवाद सल्लागार म्हणून काम केलं आहे. तसंच आंध्रप्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचं पद सांभाळलं आहे. परकलाचं शिक्षण हैदराबादमध्ये झालं असून, दिल्ली युनिव्हर्सिटीतून इंग्रजी साहित्यात बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर ऑफ आर्ट्स केलं आहे.   

5/7

वांगमयी यानंतर पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेली होती. नॉर्थवेस्टरन युनिव्हर्सिटीतून तिने पत्रकारितेत मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली. सध्या ती एका राष्ट्रीय वृत्तपत्रात काम करत असून आर्ट, लाइफस्टाइल आणि टेक्नॉलॉजी यावर पुस्तक लिहित आहे.   

6/7

दरम्यान, निर्मला सीतारामण यांचा जावई प्रतीक दोशी सध्या पंतप्रधान कार्यालयात स्पेशल ड्युटी ऑफिसर म्हणून रिसर्च अॅण्ड स्ट्रॅटेजी विंगमध्ये काम करत आहे. जून 2019 मध्ये त्यांना संयुक्त सचिव पदावरुन बढती देण्यात आली.   

7/7

प्रतीक दोशीने सिंगापूर मॅनेजमेंट स्कूलमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं आहे.