कोण आहे Sana Makbul चा करोडपती बॉयफ्रेंड? अनेक कंपन्यांचा आहे संस्थापक

Who Is Sana Makbul Boyfriend Srikanth Bureddy:  'बिग बॉस ओटीटी 3' च्या तिसऱ्या सीझनची विजेतीची घोषणा झाल्यानंतर सना मकबूलचा बॉयफ्रेंड कोण आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. 

नेहा चौधरी | Aug 03, 2024, 12:52 PM IST
twitter
1/7

गेल्या 2 महिन्यापासून बिग बॉस OTT 3 ची सर्वत्र चर्चा होती. शुक्रवारी रात्री या शोचा विजता घोषित करण्यात आला. टीव्ही अभिनेत्री-मॉडेल सना मकबूल ही बिग बॉस OTT 3 ची विजेती ठरली. प्रसिद्ध रॅपर नेझी हा सेकंड रनर अप होता ठरला.   

twitter
2/7

 सना मकबूल विजेती घोषित केल्यानंतर तिच्यावर सर्व चाहते, बिग बॉस घरातील मित्र तसंच टीव्ही इंडस्ट्रीतील मित्र आणि कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षावर सुरु आहे. तिच्या या आनंदात कुटुंबासोबत एक व्यक्तीने खास लक्ष वेधून घेतले. 

twitter
3/7

सना मकबूलच्या विजयानंतर, तिची आई आणि बहीण अभिनंदन करण्यासाठी स्टेजवर आले. तेव्हाच एक अजून व्यक्ती जो तिचा बॉयफ्रेंड श्रीकांत बुरेड्डी होता. श्रीकांतने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर सनासोबतचा एक सुंदर सेल्फी शेअर केलाय. ज्यामध्ये सना आनंदाने नाचत दिसतंय. श्रीकांतने BB OTT 3 ची ट्रॉफी हातात धरलीय.

twitter
4/7

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी सना मकबूलने 'बिग बॉस OTT 3' ची ट्रॉफी जिंकल्याच घोषित केलं. तिने बॉयफ्रेंड श्रीकांतसोबतही विजयाचा आनंद साजरा केला. त्यामुळे हा व्यक्ती नक्की करतो तरी काय अशी चर्चा रंगलीय. 

twitter
5/7

सना मकबूलने तिचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच लाइमलाइटपासून दूर ठेवलंय. मात्र, बिग बॉसमध्ये ती अनेकदा रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल बोलताना दिसलीय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा मिस्ट्री मॅन बॅडिलॉनचा संस्थापक श्रीकांत बुरेड्डी आहे. बडीलोन ही वैयक्तिक कर्ज देणारी कंपनी असून रिपोर्ट्सनुसार, सना मकबूल ही त्याची ब्रँड ॲम्बेसेडर आहे. 

twitter
6/7

श्रीकांत बुरेड्डी हे व्यापारी असून बॅडीलोनसोबतच तो इतर अनेक कंपन्यांचा संस्थापक असल्याच मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. इतकंच नाही तर सना मकबूलच्या वाढदिवसानिमित्त श्रीकांत बुरेड्डीने एक रोमँटिक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये तो सनासोबत वाढदिवसाचा केक कापताना आणि तिला किस करताना दिसला होता. दोघांमधील रोमान्समुळे त्यांच्या नात्याला पुष्टी मिळाली होती. पोस्टमध्ये इतर मित्रही एकत्र दिसत आहेत. 

twitter
7/7

मीट ब्रदर्सच्या चमकदार कामगिरीने सना मकबूल इतकी प्रभावित झाली की तिने तिच्या लग्नासाठी त्यांना बुक करण्याचा विचार करत असल्याचे संकेत दिलंय. अशा परिस्थितीत शो जिंकल्यानंतर सना मकबूल लवकरच लग्न करू शकतं याबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता आहे. 

twitter