संत्र कोणी खाऊ नये!

Who Should Not Eat Orange: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी, डॉक्टर आपल्याला फळं खाण्याचा सल्ला देतात. ज्यामुळे आपल्याला जीवनसत्त्वे आणि फायबर मिळतात. संत्रं हे व्हिटॅमिन सीचं चांगलं स्रोत मानलं जातं. 

| Apr 05, 2024, 16:20 PM IST
1/7

संत्रं हे एक फळ आहे ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. शिवाय यामध्ये असलेले पोषक तत्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

2/7

पण तुम्हाला माहित आहे का की, संत्री खाण्याचे अनेक तोटे आहेत. काही व्यक्तींनी संत्र्याचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

3/7

तज्ज्ञांच्या मते, ज्या व्यक्तींना किडनीचा त्रास आहे त्यांनी संत्रं खाऊ नये. त्यामुळे या व्यक्तींच्या अडचणी आणखी वाढू शकतात.

4/7

ज्यांना छातीत जळजळ होते त्यांनी संत्र्याचे सेवन करू नये. संत्र्यामध्ये ॲसिडिक गुणधर्म आढळतात. त्यामुळे या फळाच्या सेवनाने छातीत जळजळ होण्याची समस्या आणखी वाढू शकते.

5/7

ज्या लोकांना बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीची समस्या आहे त्यांनी संत्र्याचे सेवन करू नये.

6/7

ज्यांना हाडं तसंच सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनीही संत्र्याचे सेवन करू नये.  

7/7

ज्या लोकांना दातांच्या समस्या आहेत त्यांनी संत्री खाऊ नयेत. संत्रं दातांमध्ये असलेल्या कॅल्शियमशी संयोग होऊन बॅक्टेरिया तयार करतात, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.