चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळं सौंदर्य कमी होतेय? या 5 चुका आत्ताच टाळा

या पाच कारणांमुळं तुम्ही वयापेक्षा मोठे दिसताय? चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आत्ताच या पाच चुका टाळा  

| Jul 04, 2023, 19:13 PM IST

या पाच कारणांमुळं तुम्ही वयापेक्षा मोठे दिसताय? चेहऱ्यांवरील सुरकुत्या कमी करण्यासाठी आत्ताच या पाच चुका टाळा  

1/6

चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळं सौंदर्य कमी होतेय? या 5 चुका आत्ताच टाळा

why do i suddenly have wrinkles in marathi

बिघडलेली जीवनशैली, जंकफूडचे सेवन, प्रदूषण यासर्वांचा आरोग्यावर हानिकारक परिणाम होत आहे. यामुळं चेहऱ्याचा पोतही बिघडतोय. तरुण वयातच चेहरा निस्तेज दिसू लागतो. तर, चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्यामुळं तुम्ही अकाली वृद्ध दिसू लागतात. मग या खुणा लपवण्यासाठी मेकअपचा आधार घ्यावा लागतो. मात्र, आजच या पाच चुका टाळल्यास तुम्ही पुन्हा नितळ त्वचा मिळवू शकता

2/6

उन्हात जास्त काळ फिरणे

why do i suddenly have wrinkles in marathi

उन्हात जास्त वेळ काम करत असल्यास त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात. सूर्याची किरणे थेट त्वचेवर पडल्यामुळं चेहऱ्याचे नुकसान होते. चेहऱ्यावर जळजळ होते त्याचबरोबर त्वचेवर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळं घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावावे किंवा चेहरा झाकून घ्यावा.   

3/6

साखर

why do i suddenly have wrinkles in marathi

गरजेपेक्षा जास्त साखर खाल्ल्यास त्याचा त्वचेवर गंभीर परिणाम होतो त्यामुळं चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात. साखर स्किन टाइटनेस कमी करते तसंच, कोलेजनचे उत्पादनही कमी करते. त्यामुळं चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात.

4/6

तणाव

why do i suddenly have wrinkles in marathi

कामाचा अतिरिक्त ताण घेतल्यास चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. आजच्या जीवनशैलीमुळं तरुण वर्ग सतत तणावात असतात त्याचा प्रभाव त्वचेवर पडतो. ताण-तणावामुळं कोर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळं वृद्धत्वाची लक्षणे उठून दिसतात. 

5/6

मद्यपान

why do i suddenly have wrinkles in marathi

6/6

प्रदूषण

why do i suddenly have wrinkles in marathi

प्रदूषणामुळंही सुरकुत्या पडून शकतात. चेहरा सतत प्रदूषणाच्या संपर्कात येतो. ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस वाढल्याने चेहऱ्यावर एजिंगचे लक्षण दिसून येतात. प्रदूषण इलास्टिन आणि कोलेजनला नुकसान पोहोचवते आणि त्यामुळं सुरकुत्या वाढत जातात.