iPhone एवढा महाग का असतो? जाणून घ्या यामागील 7 खास कारणं

Why iPhones Are Expensive: आपल्याकडे आयफोन असावा असं प्रत्येकाला कधी ना कधी वाटतं. त्यात दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन आयफोन बाजारामध्ये येतो. त्यामुळेच आयफोनबद्दलच आकर्षण या महिन्यामध्ये अधिकच वाढतं. मात्र प्रत्येकालाच आयफोन विकत घेणं शक्य होतं नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे आयफोनची किंमत ही सामान्य फोनपेक्षा अनेक पटींनी अधिक असते. पण आयफोनची किंमत अधिक असण्यामागील नेमकी कारणं काय आहेत? हे असं का असतं याबद्दल जाणून घेऊयात...

| Sep 11, 2023, 16:27 PM IST
1/9

why iphones are expensive

Apple कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या प्रोडक्टची नवीन रेंज बाजारामध्ये आणते. दरवर्षी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील जाणकार या कार्यक्रमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. 

2/9

why iphones are expensive

Apple च्या या कार्यक्रमाच्या आसपास आयफोनच्या किंमतीवरुन अनेक मिम्स शेअर होत असतात. यामागील मुख्य कारण म्हणजे अनेकदा या किंमती सामान्यांना न परवडणाऱ्या असतात. आज आपण Apple चे आयफोन महाग का असतात हे जाणून घेणार आहोत.

3/9

why iphones are expensive

Apple च्या आयफोनचा वेग हा दिर्घकाळ कायम टिकून राहतो. दर वर्षी Apple आपल्या हॅण्डसेटमध्ये A- सिरीज चिप्सचा चिपसेट वापरतो. हा कंपनीचा इनहाऊस चिपसेट आहे.

4/9

why iphones are expensive

याउलट अॅण्ड्रॉइड फोन जुने होतात त्याप्रमाणे त्यांचा वेग मंदावतो. अॅण्ड्रॉइडच्या सर्वच फोनमध्ये हे होतं. अॅण्ड्रॉइडच्या महागात महाग फोन घेतला तरी तो सुरुवातीला छान वेगाने काम करतो अन् त्यानंतर त्याचा वेग मांदावतो. 

5/9

why iphones are expensive

अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोन अधिक सुरक्षित असतात. हे फोन हॅक होण्याची शक्यता फारच कमी असते. अनेकजण केवळ डेटा सुरक्षेच्या दृष्टीने अॅण्ड्रॉइडऐवजी आयफोनला प्राधान्य देतात. गुगल स्टोअरवर अनेक असे अॅप्स असतात जे अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये मालवेअर पसरवतात. या मालवेअरच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक होऊ शकते.

6/9

why iphones are expensive

अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनच्या कॅमेरांचे सेन्सर्स हे अधिक उत्तम असतात. मागील वर्षी आयफोन 14 प्रोमध्ये पहिल्यांदा कंपनीने 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला. अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये अगदी 200 मेगापिक्सलपर्यंत कॅमेरा असतात. यामध्ये रेडमी, रिअलमी, सॅमसंग सारख्या कंपन्यांच्या फोन्सचा समावेश आहे.

7/9

why iphones are expensive

आयफोनचं हार्डवेअर बनवण्यासाठी खास गोष्टींचा वापर केला जातो. तसेच आयफोनचे डिझाइन हे अॅण्ड्रॉइडपेक्षा अधिक सरस असते. यासाठी वापरलेलं मटेरियलही जास्त काळ टिकेल असं असतं. बहुतांश अॅण्ड्रॉइड स्मार्टफोनमध्ये प्लास्टिक बॉडी वापरली जाते. त्यामुळे ते दिर्घकाळ टीकण्याची शक्यता कमी असते.

8/9

why iphones are expensive

Apple कंपनी प्रोडक्ट तयार करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात संशोधन करते. त्यामुळेच कंपनी फोन विकताना अधिक किंमत आकारते. 

9/9

why iphones are expensive

यंदाच्या वर्षी Apple कंपनी काय नवीन सेवा आणि सुविधा लॉन्च करते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आयफोन 15 च्या घोषणेचा हा कार्यक्रम 15 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.