World AIDS Day: दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन? जाणून घ्या त्यामागचा हेतू आणि यंदाची थीम

World AIDS Day 2023: दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस जगभरात जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र 1 डिसेंबर रोजीच हा दिवस मानला जातो हे आपण जाणून घेऊया

| Dec 01, 2023, 10:28 AM IST
1/7

जागतिक एड्स दिन हा विशेष दिवस लोकांमध्ये एचआयव्ही संसर्गाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो. 

2/7

या आजारामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने शरीर रोगांपासून स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. हे एचआयव्ही विषाणूच्या संसर्गामुळे होते.

3/7

पहिल्यांदा जागतिक एड्स दिन 01 डिसेंबर 1988 रोजी साजरा करण्यात आला. 

4/7

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2022 च्या आकडेवारीनुसार, जगभरात सुमारे 39 दशलक्ष लोक एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.   

5/7

एड्सचा प्रतिबंध करण्यासाठी, लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जागतिक एड्स साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली.  

6/7

दरवर्षी जागतिक एड्स दिनासाठी एक खास थीम ठेवली जाते. या वर्षी जागतिक एड्स दिनाची थीम कम्यूनिटीज लीड (Let Communities Lead) अशी आहे. 

7/7

एड्स रोखण्यासाठी समाजाची महत्त्वाची भूमिका लोकांना सांगण्यासाठी ही खास थीम निवडण्यात आली आहे.