'सफेदी ही सफेदी...' काश्मीरमध्ये नजर जाईल तिथं बर्फ; या स्वर्गीय सफरीवर तुम्ही कधी निघताय?

Kashmir Snowfall: बर्फवृष्टीमुळं काश्मीरच्या खोऱ्यातील दृश्य बदललं, पाहून म्हणाल हे सर्व कमालच आहे.... 

Dec 01, 2023, 08:31 AM IST

Kashmir Snowfall: पृथ्वीवरील स्वर्ग, पृथ्वीचं नंदनवन अशी ओळख असणाऱ्या काश्मीरमध्ये वर्षातील सर्वात सुरेख काळ सुरु झाला आहे. कारण, इथं आता दिवसागणिक थंडीचा कडाका आणखी वाढताना दिसत आहे. 

1/8

काश्मीरचा हिवाळा

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

काश्मीरचा हिवाळा म्हटलं की काही गोष्टी आपोआपच डोळ्यांसमोर उभ्या राहतात. त्यापैकी एक म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा बर्फ.   

2/8

थक्क करणारं दृश्य

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

सध्या या प्रांतामध्ये असंच काहीसं थक्क करणारं दृश्य पाहायला मिळत आहे. कारण, काश्मीरच्या खोऱ्यासह नजीकच्या भागात तापमान बऱ्याच अंशी कमी झालं असून, थंडीचा कडाका वाढला आहे. 

3/8

गुलमर्ग

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

काश्मीरच्या गुलमर्ग, सोनमर्गमध्ये प्रचंड हिमवृष्टी झाल्यामुळं इथं अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. 

4/8

मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

तिथं श्रीनगर आणि मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी असल्यामुळं पर्वतांवरून येणाऱ्या शीतलहरी आणि पाऊस यामुळं इथं आलेल्या पर्यटकांना हुडहूडी भरली आहे. 

5/8

बर्फवृष्टी सुरुच

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात बर्फवृष्टी सुरुच राहणार आहे. तर, श्रीनगरमध्ये तापमान 5.3 अंशांवर असेल. 

6/8

वाहतूक विस्कळीत

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

अती बर्फवृष्टीमुळं काश्मीरमधील मुघल रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. ज्यामुळं श्रीनगर-सोनमर्ग- गुमरीमधील वाहतूक ठप्प आहे. 

7/8

हिमवृष्टी

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

एकिकडे हिमवृष्टीमुळं काश्मीरच्या काही रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली असली तरीही इथं आलेल्या पर्यटकांसाठी मात्र ही परवणी ठरत आहे. 

8/8

इथं येण्याची इच्छा झाली ना?

Kashmir Snowfall cheers up tourist as valley gets covered with fresh snow

पृथ्वीच्या या नंदनवनातलं एकंदर वातावरण पाहता तुमचीही या भुरभुरणाऱ्या बर्फाचा आनंद घेण्याची इच्छा झाली ना?