केळीच्या पानात वाढलेल्या जेवणानंच का सोडतात उपवास? शास्त्रोक्त कारण काय?

श्रावण महिना हा सण-वारांनी भरलेला महिना. या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे होतात. अशावेळी उपवासाच्यावेळी किंवा देवाला नैवेद्य दाखवताना ते केळीच्या पानात दाखवलं जातं. केळीच्या पानात जेवणाचे कारण काय? आरोग्यदायी फायदे काय?

| Aug 26, 2024, 15:20 PM IST

श्रावण महिना हा सण-वारांनी भरलेला महिना. या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे होतात. अशावेळी उपवासाच्यावेळी किंवा देवाला नैवेद्य दाखवताना ते केळीच्या पानात दाखवलं जातं. केळीच्या पानात जेवणाचे कारण काय? आरोग्यदायी फायदे काय?

1/7

हिंदू धर्मात अनेकदा उपवास हा केळीच्या पानातच सोडला जातो. आज जन्माष्टमी या दिवशीही केळीच्या पानातच बाळगोपाळाला नैवेद्य दाखविला जातो. यामागचं कारण का? भारतात केळीच्या पानात का जेवलं जातं? 

2/7

शुद्ध मानलं जातं

वर्षानुवर्षे केळ्याच्या पानांचा वापर हा जेवणासाठी देखील केला जातो. आजही भारताच्या दक्षिणेकडे गेलात तर तिथे अनेक घरांत केळीच्या पानांची परंपरा आहे. खरं तर या केळीच्या पानांना अतिशय पवित्र आणि शुद्ध समजलं जातं. एवढंच नव्हे तर देवाला नैवेद्य देखील केळीच्या पानात दाखवला जातो. साऊथ इंडियन लोकं किंवा इतर लोकं आजही सणावारांना केळीच्या पानात जेवतात. 

3/7

जेवणाचे वेगळेपण

या पानांमध्ये पॉलीफेनॉल नावाचे अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे ग्रीन टी आणि काही पालेभाज्यांमध्ये देखील आढळतात आणि जीवनशैलीतील अनेक आजार टाळू शकतात. ही पाने जेवणासाठी किंवा उपवास सोडायला वापरली जातात. कारण ती आकाराने मोठी असतात आणि वेगवेगळ्या आकारात कापून कोणत्याही आकाराच्या प्लेटमध्ये ठेवता येतात. तसेच, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या पानांवर मेणासारखा थर असतो, ज्यामुळे त्यांना स्वच्छ करणे सोपे होतेच पण ते अन्नाची चवही वाढवतात. 

4/7

कमी दरात मिळतात

केळीच्या पानांना खूप सोईचे मानले जाते. महत्त्वाची म्हणजे याची किंमत इतर कोणत्याही प्लेट पेक्षा कमी असते. तसेच केळीचे पाने घाऊक भावातही उपलब्ध होते. केळ्याच्या पानांची वेगवेगळी किंमत असते. त्यामुळे ही पाने सहज जेवणासाठी वापरु शकतात.   

5/7

वॉटरप्रूफ क्वालिटी

तुम्हाला कधी प्रश्न पडतो का? की, केळीच्या पानावर तेलकट पदार्थ कसा राहतो? या पानांमध्ये वॉटर प्रूफ गुण आहे. या प्लेटमध्ये त्यामुळे रस्सा भाजीचा आनंद सहज घेता ये शकतो. 

6/7

जास्त साफ आणि हायजिनिक

या पानांचा बाहेरील भाग हा मेण्यासारखा असतो. यामुळे ते साफ करणे सहज सोपे होते. कारण यावरील धूळ सहज साफ करता येते. ही पाने सहज धुवून पुसून वापरणे सोपे होते. दक्षिण भारतातील अनेक रेस्टॉरंटमध्ये देखील केळीच्या पानात जेवण वाढले जाते. 

7/7

मोठ्या पानांवर जेवणं वाढणे सोपे

केळीचे पान हे इतर पानांप्रमाणे लहान नसते. ही पाने आकाराने मोठी असल्यामुळे तसेच या पानांना सहज कापता येते. तसेच या पानांत भरपूर प्रमाणात पदार्थ वाढणे सोपे गरजेचे आहे. त्यामुळे कोणत्याही पाहुण्यांना यामध्ये जेवण वाढणे सहज शक्य होते.