Interesting Facts : समुद्रात का तयार होतात लाटा? 99 टक्के हुशार मंडळींनाही उत्तर जमलेलं नाही

Interesting Facts : समुद्र म्हणजे एखाद्यासाठी मित्र, एखाद्यासाठी हक्काचा माणूस, एखाद्यासाठी आठवणींचं ठिकाण वगैरे वगैरे. थोडक्यात या समुद्राची रुपं प्रत्येकासाठी वेगळी पण, तितकीच हवीहवीशी. 

Mar 05, 2024, 16:32 PM IST

Interesting Facts : अथांग समुद्राकडे पाहत असताना त्याच्यासारखं आपणही अथांग असावं, आपल्या मनाचा मोठेपणाही असाच असावा असं अनेकांना वाटतं. किंबहुना या समुद्राला पाहून अनेकांचं कवीमनही जागं होतं. 

1/7

समुद्र

Why waves are formed in sea know the reason

Interesting Facts : समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहून त्याच्याकडे एकटक पाहणाऱ्यांपैकी तुमच्यातील अनेकजण असतील. किनाऱ्यावर उभं असताना कोणत्या लाटेनं पायाखालची वाळू निसटली, हेसुद्धा अनेकांच्यात लक्षात असेल. 

2/7

भरती आणि ओहोटी

Why waves are formed in sea know the reason

हाच समुद्र त्याच्या पोटात किती रहस्य दडवून बसलाय याची तुम्हाला कल्पना आहे का? समुद्राच्या भरती आणि ओहोटीचं गणित तुम्ही शाळेतच शिकला असाल.   

3/7

लाटा का तयार होतात?

Why waves are formed in sea know the reason

अशा या समुद्राबाबतच्या एका गमतीशीर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का? तुम्हाला माहितीये का समुद्रात लाटा नेमक्या का तयार होतात? 

4/7

वाऱ्याची उर्जा

Why waves are formed in sea know the reason

Oceanservice.noaa.gov च्या माहितीनुसार समुद्रात तयार होणाऱ्या खळाळत्या लाटांमागेही एक कारण आहे. या लाटा पाण्यावरून जाणाऱ्या वाऱ्याच्या उर्जेमुळं / वायू उर्जेमुळं उत्पन्न होतात.   

5/7

वाऱ्याचा झोत

Why waves are formed in sea know the reason

जेव्हा समुद्राच्या पृष्ठावरून वाऱ्याचा जोरदार झोत जातो तेव्हा त्याचमुळं समुद्रात लाटा तयार होतात. ज्यामुळं अनेकदा समुद्राच्या पृष्ठावर लाटा दिसतात आणि याच लाटा किनाऱ्यावर आदळतात. ही कृती पाण्याची गती आणि हवेचा परिणाम अधोरेखित करतं. 

6/7

गुरुत्वाकर्षणामुळं तयार होणाऱ्या लाटा

Why waves are formed in sea know the reason

समुद्रात गुरुत्वाकर्षणामुळं तयार होणाऱ्या लाटा अनेकदा रौद्र रुप धारण करून आपत्तीचं स्वरुपही घेतात. या लाटा त्सुनामी म्हणून ओळखल्या जातात. 

7/7

शास्त्रीय कारण

Why waves are formed in sea know the reason

थोडक्यात समुद्रात लाटा तयार होण्यामागंही शास्त्रीय कारण असून, या लाटांचं स्वरुप समुद्रातील स्थिती आणि वाऱ्यांची एकंदर दिशाही आपल्याला नकळत सांगत असते.