जैन समाजाच्या योगदानाशिवाय देशाचा जीडीपी पूर्ण होत नाही - देवेंद्र फडणवीस

रविवारी शेकडो नागपुरकर अहिंसेची शपथ घेऊन धावले आहेत. या धावण्याच्या स्पर्धेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्येही नोंद करण्यात आली आहे. नागपूर येथे जीतो अहिंसा रनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बक्षीस वितरण समारंभात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Apr 02, 2023, 11:47 AM IST
1/5

devendra fadnavis nagpur

भगवान महावीर यांनी अहिंसेचा मंत्र दिला. भगवान महावीरचा जो विचार आहे तो विचार देशाला वाचू शकतो. आपण संसाधनाचा भरपूर वापर करुन ते नष्ट करत आहोत. त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

2/5

devendra fadnavis bhagwan Mahavir

यातून बाहेर पडण्यासाठी धरती मातेला वाचवण्यासाठी भगवान महावीर यांच्या विचाराचे पालन आपल्याला करावे लागेल. शांतीच्या माध्यमातून केवळ शांतीची शपथ घेत नाही तर शांतीचा मार्ग चालण्याची शपथही आपण घेत असतो.

3/5

india jain community

जैन समाज देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान देणारा समाज आहे. देशाच्या जीडीपी मध्ये सर्वात मोठा सहभाग हा जैन समाजाचा आहे.  

4/5

Devendra fadnavis jain community

त्यामुळे जैन समाजाच्या सहभागाशिवाय आपला जीडीपी पूर्ण होऊ शकत नाही. जैन समाज कौतुकास पात्र आहे.

5/5

devndra fadnavis GDP

जैन समाज केवळ जीडीपीमध्ये आपले योगदान देऊन थांबत नाही तर समाजातील वेगवेगळे सामाजिक कार्य करण्याचे काम जैन समाज करत असतो. गोसेवेपासून मानव सेवेपर्यंत सर्व कामे जैन समाज करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.