Mumbai Indians ने दिलं चाहत्यांना मोठं गिफ्ट; लाँच केली टीमची नवी जर्सी

WPL 2023: वुमेंस प्रीमियर लीग येत्या 4 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने आयोजित होणाऱ्या सर्व सामन्यांचं शेड्युल जाहीर केलंय. महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमध्ये पाच टीम सहभागी होणार आहेत. आयपीएलचा हा पहिला सिझन 4 मार्च ते 26 मार्च दरम्यान खेळवला आहे. या सिझनमधील सर्व सामने मुंबई तसंच नवी मुंबईमध्ये होणारेत.

Feb 25, 2023, 18:52 PM IST
1/5

मुंबई इंडियन्सच्या महिला टीमने महिला प्रीमियर लीगची जोरदार तयारी सुरू केलीये. टीमने आपल्या ट्विटर हँडलवर फोटो शेअर केले असून, आमच्या टीमचं पहिलं प्रॅक्टिस सेशन, असं कॅप्शन दिलंय.

2/5

मुंबई इंडियन्सच्या टीमचा पहिला सामना गुजरात जाएंट्सच्या टीमशी होणार आहे. 

3/5

मुंबईच्या टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर अजून टीममध्ये सामील झालेली नाहीये. दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-20 वर्ल्डकपनंतर ती स्क्वॉडसोबत जोडली जाईल.

4/5

मुंबई इंडियन्सच्या टीमने शार्लोट एडवर्ड्सला टीमचं मुख्य कोच बनवलंय. तर टीमची गोलंदाजी कोच आणि मार्गदर्शक म्हणून झूलन गोस्वामीला नियुक्त करण्यात आलंय.

5/5

मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 4 मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. यावेळी मुंबईच्या टीमने महिला लीगसाठी नवीन जर्सीही लाँच केलीये.