Team India: वनडे फॉर्मेटचे 2 वर्ल्डकप जिंकले; टीम इंडियाच्या जर्सीवर 'हा' तिसरा स्टार कसा?

Team India: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सध्या वनडे सिरीज सुरु आहे. दरम्यान पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाची जर्सी काहीशी वेगळी दिसून आली.

| Aug 02, 2024, 17:32 PM IST
1/7

2 ऑगस्टपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये वनडे सिरीजला सुरुवात झाली आहे. 

2/7

यावेळी टॉसवेळी आलेल्या रोहित शर्माची जर्सी पाहताच त्याचं वेगळेपण यावेळी चाहत्यांच्या लक्षात आलंय. यावेळी वनडेच्या जर्सीवर बीसीसीआयच्या लोगोवर 3 स्टार असल्याचं दिसून आलं.

3/7

नुकंतच टीम इंडियाने टी-20 वर्ल्डकप जिंकला त्यामुळे टी-20 फॉर्मेटच्या जर्सीवर 2 स्टार लावण्यात आले आहे. 

4/7

टीम इंडियाने 2 टी-20 वर्ल्डकप जिंकल्यामुळे हे 2 स्टार लावण्यात आलेत. 

5/7

मात्र टीम इंडियाने 50 ओव्हर्सच्या फॉर्मेटमधील वर्ल्डकप दोन वेळा जिंकला आहे. मात्र तरीही जर्सीवर 3 स्टार कसे असा प्रश्न उपस्थित होतोय.

6/7

दरम्यान यामध्ये हे दोन स्टार वर्ल्डकप जिंकल्याचे आहेत. तर जर्सीवर असलेला तिसरा स्टार हा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याचा आहे.   

7/7

टीम इंडियाने 1983, 2011 वर्षांमध्ये वर्ल्डकप जिंकला होता. तर 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे वनडे फॉर्मेटच्या जर्सीवर हे 3 स्टार लावण्यात आले आहेत.