लग्नासाठी कोणी पुरुष तयार आहे का? या 7 देशांमध्ये अनेक महिला आहेत प्रतिक्षेत

| Sep 02, 2024, 11:38 AM IST
1/10

लग्नासाठी कोणी पुरुष तयार आहे का? या 7 देशांमध्ये अनेक महिला लग्नाविना

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

females more than males: जगाच्या लोकसंख्येत पुरुषांची लोकसंख्या महिलांपेक्षा जास्त आहे. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा खूपच कमी आहे. एक काळ असा होता की भारतातही लिंग गुणोत्तरात बरीच असमानता होती. हरियाणात मुलांपेक्षा मुलींची संख्या खूपच कमी होती. मात्र आता सरकारने बेटी बचाव, बेटी पढाव सारखी धोरणं आणली आहेत. मुलींना शिक्षण मोफत करण्यात आलंय. त्यामुळे परिस्थिती थोडी बरी झाली आहे.

2/10

लग्न करण्यात अडचणी

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

पण कतार, संयुक्त अरब अमिराती, कतार आणि ओमानसारख्या देशांमध्ये पुरुषांची लोकसंख्या महिलांपेक्षा जास्त आहे. येथे पुरुषांची संख्या कमी असल्याने महिलांना काही वेळा लग्न करण्यात अडचणी येतात. याबद्दल जाणून घेऊया. 

3/10

सामुहिक फाशी

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

पहिल्या महायुद्धादरम्यान आणि नंतर झालेल्या आर्मेनियन नरसंहाराच्या परिणामांमुळे आर्मेनियामध्ये पुरुषांची कमतरता भासतेय.तुर्की-ऑट्टोमन राजवटीत, 1.5 दशलक्ष आर्मेनियन लोकांना सामुहिक फाशी देण्यात आली. त्यांना सीरियन वाळवंटात मृत्यूच्या दारात नेण्यात आले.

4/10

आर्मेनिया

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  जगातील सर्वाधिक 55 टक्के महिलांची संख्या आर्मेनियामध्ये आहे. परंतु जन्मदर अजूनही मुलांच्या बाजूने आहे. येथे दरवर्षी 100 मुलींच्या तुलनेत 110 मुले जन्माला येतात. इथे पुरुषांची कमतरता असण्याची अनेक कारणे आहेत. 20 व्या शतकात आर्मेनियाला खूप संकटांना तोंड द्यावे लागले. सोव्हिएत राजवट आणि त्यांच्या शेजाऱ्या राष्ट्राशी झालेल्या युद्धांमुळे देशाला नुकसान झाले.

5/10

युक्रेन

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  सध्या रशियाशी युद्ध सुरू असलेल्या युक्रेनमध्ये 54.40 टक्के महिला आहेत. मात्र युद्धामुळे येथे अनेक पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे दोघांमधील अंतर आणखी वाढणार आहे. दुसऱ्या महायुद्धामुळे युक्रेनची पुरुषसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. ती इतकी कमी झालीय की आजपर्यंत ती 1941 च्या पातळीपर्यंत पोहोचलेली नाही.

6/10

बेलारूस

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  बेलारूसमध्येही महिलांची लोकसंख्या 53.99 टक्के आहे.  दुसऱ्या महायुद्धात हा देश पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. बेलारूसच्या संपूर्ण लोकसंख्येपैकी एक चतुर्थांश लोक लढाई दरम्यान मरण पावले. संघर्षात दरडोई मृतांची संख्या सर्वाधिक होती. बेलारूस हा युरोपमधील सर्वात गरीब देशांपैकी एक आहे. येथील राहणीमान कमी आणि आर्थिक शक्यता कमी आहे. या कारणास्तव येथील तरुणांना उर्वरित युरोपात पळून जावे लागत आहे.

7/10

लाटविया

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  येथील महिलांची लोकसंख्या 53.57 टक्के आहे. बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला हा एक छोटासा देश आहे. इथल्या पुरूषांना धूम्रपान आणि अति मद्यपानाची सवय आहे. त्यामुळे येथील पुरूषांमध्ये कॅन्सर आणि हृदयविकारचे प्रमाण खूप मोठे आहे. लॅटव्हियातील पुरुषांचे आयुर्मान 68 वर्षे आहे. तर स्त्रियांचे आयुर्मान 10 वर्षे अधिक म्हणजे 78 वर्षे इतके आहे. पुरुषांमध्ये आत्महत्येचे प्रमाणही येथे खूप जास्त आहे.

8/10

रशिया

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  भारताचा जवळचा मित्र रशियामध्ये 53.55 टक्के महिला आहेत. दुसऱ्या महायुद्धाचा परिणाम रशियावरही झाला आहे. दुसऱ्या महायुद्धात इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सोव्हिएत युनियनचे सर्वाधिक नुकसान झाले. येथे 27 दशलक्ष लोक मारले गेले. पण इथे लोकसंख्या कमी आहे कारण पुरुषांमध्ये दारू पिण्याचे व्यसन खूप जास्त आहे. रशियातील पुरुष लोकसंख्येला धूम्रपान आणि अल्कोहोलमुळे बरेच दुष्परिणाम सहन करावे लागले आहेत.

9/10

लिथुआनिया

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  येथील महिलांची लोकसंख्या 53.02 टक्के आहे. लॅटव्हियाप्रमाणेच इथल्या पुरुषांनाही हीच समस्या आहे. धूम्रपान आणि दारूच्या व्यसनाने पुरुषांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. येथील पुरुष अधिक चांगल्या जीवनाच्या शोधात जर्मनी किंवा इंग्लंडमध्ये जात आहेत.

10/10

जॉर्जिया

World Countries Where Male are Less then Women Ajab Gajab News

  3.7 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा एक छोटासा देश आहे. येथे महिलांची लोकसंख्या 52.98 टक्के आणि पुरुषांची 47.02 टक्के आहे. पण इथली अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. म्हणून इथून पुरुष पळून जगातल्या इतर देशात जातात. त्यामुळे स्त्री-पुरुष लोकसंख्येतील अंतर झपाट्याने वाढत आहे.