World Cup 2023 Prize Money : वर्ल्डकप विजेती टीम होणार मालामाल, उपविजेत्यांवरही बरसणार पैशांचा पाऊस

World Cup 2023 Prize Money : 5 ऑक्टोबरपासून भारतात आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. तर अंतिम सामना याच मैदानावर 19 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे.   

| Oct 04, 2023, 11:14 AM IST
1/6

दरम्यान यासाठी आयसीसीने विजेत्यांना मिळणाऱ्या प्राईज मनीबाबत माहिती दिलीये. ICC ने 10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे 82.93 कोटी रुपये वर्ल्ड कप 2023 साठी एकूण बजेट ठेवलंय आहे. 

2/6

यावेळी वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीमसोबतच उपविजेत्या आणि गटातून बाहेर पडणाऱ्या संघांवरही पैशांचा वर्षाव केला जाणार आहे.  

3/6

ICC ने सांगितलंय की, 2023 मध्ये भारतात होणार्‍या वनडे वर्ल्डकप विजेत्याला 40 लाख डॉलर्स म्हणजेच सुमारे 33.18 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम मिळणार आहेत. 

4/6

याशिवाय अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या टीमला 2 दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच 16.59 कोटी रुपये मिळतील. 

5/6

वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप स्टेजमधील सामने जिंकण्यासाठी बक्षीस रक्कमही देण्यात येते. यावेळी प्रत्येक विजयासाठी टीमला 40 हजार यूएस डॉलर म्हणजेच 33.17 लाख रुपये मिळतील. 

6/6

वर्ल्डकप स्पर्धेत ग्रुप स्टेजमधील सामने जिंकण्यासाठी बक्षीस रक्कमही देण्यात येते. यावेळी प्रत्येक विजयासाठी टीमला 40 हजार यूएस डॉलर म्हणजेच 33.17 लाख रुपये मिळतील.