भारतीय संघातील दिग्गज सदस्याला पैशांची चणचण? त्यानंच सांगितलं बोचरं सत्य

Team India : आजवर संघाच्या प्रशिक्षकपदीही अनेकजण विराजमान झाले, त्यांनी संघाला वेगळी दिशा दिली. 

Oct 28, 2023, 11:57 AM IST

Team India : भारतीय क्रिकेट संघात आजवर अनेक खेळाडू आले, खेळले, निवृत्तही झाले. फक्त खेळाडूच नव्हे, तर संघातील इतर सदस्यांच्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळालं. 

1/8

माजी सदस्य

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

टीम इंडियातील एक असाच माजी सदस्य सध्या मात्र एका अशा परिस्थितीला सामोरा जात आहे की, त्याची परिस्थिती पाहून अनेकांनाच यावर विश्वास बसत नाहीये.   

2/8

ग्रेग चॅपल

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

भारतीय क्रिकेट संघात कधी एकेकाळी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अशी ओळख असणाऱ्या ग्रेग चॅपल यांच्याविषयी नुकतीच ही धास्तावणारी माहिती समोरस आली आहे.   

3/8

आर्थिक अडचणी

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार ग्रेग चॅपल सध्या बऱ्याच आर्थिक अडचणींना समोरे जात आहेत.

4/8

मित्रांचा पुढाकार

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

आर्थिक संकटाशी दोन हात करणाऱ्या ग्रेग यांच्या मदतीसाठी आता त्यांच्या मित्रांनी पुढाकार घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी पैसे जमवण्यासाठी काही ऑनलाईन मोहिमाही सुरु केल्या आहेत. 

5/8

चॅपल म्हणतात...

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

चॅपल यांनी मात्र आपण फार बिकट परिस्थितीत नसलो तरीही सध्या आपण आलिशान जीवशैलीतही जगत नाहीये ही वस्तुस्थिती सर्वांपुढं मांडली. 

6/8

सुविधाही आम्हाला मिळत नाहीयेत

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

आम्ही क्रिकेटपटू आहोत त्यामुळं आताही आम्ही राजेशाही थाटात आयुष्य जगत असू असंच अनेकांना वाटतं. आम्ही गरीब नाही, पण आजच्या खेळाडूंइतक्या सुविधाही आम्हाला मिळत नाहीयेत हीच बाब त्यांनी प्रकाशात आणली. 

7/8

अगीच हलाखीच्या परिस्थितीत नाही

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

ग्रेग यांनी GoFundMe अभियानालाही पाठिंबा दिला. पण, इथं ते आपण अगीच हलाखीच्या परिस्थितीत नाही हे सांगण्यापासून मागंही हटले नाहीत.   

8/8

वादग्रस्त सत्र

World Cup team indian former coach greg chappell in financial crisis

75 वर्षीय ग्रेग चॅपल 2005 - 07 मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी होते. ग्रेग संघाच्या प्रशिक्षकपदी असताना त्यांच्या नावाभोवती वादाचं वलयही होतं. 2007 मध्ये त्यांच्याच नेतृत्त्वाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या भारतीय संघाला वर्ल्ड कपमधून सुरुवातीच्याच टप्प्यातून बाहेर पडावं लागलं होतं.