Railway Platform : सांगा, जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? चालताना पाय दुखतील

World Longest Railway Platform : जगात भारतात मोठे रेल्वेचे जाळे आहे. सर्वाधिक नोकरी देणारी संस्था म्हणून भारतातील रेल्वे ओळखली जाते. जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. तुम्हाला याबाबत काही माहित आहे  का?, नसेल तर जाणून घ्या. 

Mar 01, 2023, 14:30 PM IST

World Longest Railway Platform : जगात अनेक अश्या गोष्टी आहेत, त्याची आपल्याला माहिती नाही. जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे, हे तुम्हाला माहित आहे का? जगातील सर्वात लांबीचे मोठे रेल्वे स्टेशनही भारतात आहे. याबाबत अधिक  जाणून घ्या.  (Longest Railway Platform )

1/5

Railway Platform : जगात भारतात रेल्वेचे सर्वात मोठे जाळे विनलेले आहे. आपल्या देशात दररोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. तसेच जगातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म देखील भारतात आहे. 

2/5

रेल्वेने तुम्ही प्रवास केला असेल परंतु तुम्हाला सर्वाधिक लांबाचा प्लॅटफॉर्म माहित असेल असे नाही. भारतात सर्वात मोठा रेल्वे स्टेशनचा प्लॅटफॉर्म  आहे. यूपीमधील गोरखपूर रेल्वे स्थानकाचा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 2 हे जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म आहेत. 

3/5

गोरखपूर रेल्वे स्थानकातील या प्लॅटफॉर्मची लांबी 1366.4 मीटर आहे. पाहिले तर हा प्लॅटफॉर्म दीड किलोमीटर लांब आहे. जर तुम्ही या प्लॅटफॉर्मच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत गेलात तर तुम्हाला चालताना नक्कीच थकवा जाणवेल आणि तुमचे पायात दुखू लागतील.

4/5

गोरखपूर जंक्शन उत्तर-पूर्व रेल्वेच्या अंतर्गत येते. जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म असल्याने, या जंक्शनचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. या प्लॅटफॉर्मच्या पुनर्बांधणीचे काम ऑक्टोबर 2013 मध्ये करण्यात आले, त्यानंतर ते जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म बनले आहे.

5/5

रेल्वेच्या इतिसाहात यांनी नोंद करण्यात आली आहे. गोरखपूर जंक्शनवरुन दररोज 170 हून अधिक गाड्या जातात. त्याचवेळी, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 ची लांबी इतकी आहे की येथे 26 डबे असलेल्या दोन गाड्या उभ्या केल्या जाऊ शकतात