जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम

जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमधील अहमदाबादमधील मोटेरामध्ये जवळपास तयार झालं आहे. 

Feb 19, 2020, 15:24 PM IST

 २४ फेब्रुवारीला अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्टेडियमचं उद्धाटन करणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यावर आहेत.

1/8

गुजरातमधील अहमदाबादमध्ये बनवलेल्या या स्टेडियमला सरदार पटेल स्टेडियम नाव देण्यात आलं आहे. आधी हे स्टेडियम मोटेरा स्टेडियम या नावाने ओळखलं जात होतं. याची प्रेक्षक संख्या ४९ हजार इतकी होती. १९८२ मध्ये हे स्टेडियम बनवण्यात आलं होतं. त्यावेळी गुजरात सरकारने साबरमती नदीकिनारी हे स्टेडियम बनवण्यासाठी ५० कोटी रुपये खर्च केला होता.  

2/8

ऑक्टोबर २०१५ मध्ये या स्टेडियमच्या पुनर्बांधणीचं काम सुरू झालं. त्यावेळी याचं नाव बदलून सरदार पटेल स्टेडियम ठेवण्यात आलं. 

3/8

Larsen & Toubro या कंपनीने २०१६ मध्ये या स्टेडियमच्या पुनर्बांधणीचं काम सुरु केलं. त्यावेळी याच्या निर्मितीसाठी ७ अरब रुपयांचं बजेट निश्चित करण्यात आलं होतं.  

4/8

'आयसीसी'कडून सरदार वल्लभ भाई पटेल क्रिकेट स्टेडियमचा फोटो शेअर करत, हे स्टेडियम जवळपास तयार असून, यात १ लाख १० हजार प्रेक्षक बसण्याची क्षमता असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

5/8

स्टेडियम ६३ एकरवर पसरलं आहे. यात ३ प्रवेशद्वार बनवण्यात आली आहेत. ७५ कॉर्पोरेट बॉक्स, एक स्विमिंग पूल, ४ ड्रेसिंग रुम आहेत. स्टेडियममध्ये ऍन्टी-बॅक्टेरियल एलईडी लाईट लावण्यात आले आहेत. 

6/8

स्टेडियममध्ये दोन प्रॅक्टिस ग्राऊंड, इन्डोर प्रॅक्टिस पिच, बॅडमिंटन-टेनिस कोर्ट, Squash Arena, table tennis arena, थ्री-डी प्रोजेक्टर थिएटर आणि ५५ खोल्यांचा एक क्लब हाऊस बनवण्यात आला आहे.

7/8

या स्टेडियमची विषेश बाब म्हणजे, खेळ सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाल्यास, क्रिकेटचं हे मैदान केवळ अर्ध्या तासात पुन्हा खेळण्यासाठी तयार होऊ शकतं.

8/8

या स्टेडियमला मोठं पार्किंगही देण्यात आलं आहे. यात ३००० कार आणि १०,००० टू-व्हिलर ठेवण्याची क्षमता आहे. Sky-walk ही बनवण्यात आला आहे. Sky-walk वरुन प्रेक्षक थेट स्टेडियममध्ये येऊ शकतात.