Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

Dec 26, 2018, 13:14 PM IST
1/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

२०१८ हे वर्ष अगदी सुरुवातीपासूनच लग्नसराईचं वर्ष ठरलं असं म्हणायला हरकत नाही. चित्रपट, चित्रीकरण, विविध कार्यक्रम या साऱ्यामध्ये व्यग्र असणारे काही प्रसिद्ध चेहरे यंदाच्या वर्षी लग्नबंधनात अडकल. सोशल मीडियावर या सेलिब्रिटी विवाहसोहळ्यांची चर्चाही झाली. हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वात लग्नाची ही धूम पाहायला मिळाली. रणवीर-दीपिका पासून ते कपिल- गिन्नीपर्यंत बऱ्याच सेलिब्रिटी जोड्यांनी त्यांच्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची सुरुवात केली. चला तर मग यातीलच काही निवडक सेलिब्रिटी जोडप्यांच्या या प्रवासाचा धावता आढावा घेऊया.... 

2/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

कपिल शर्मा- गिन्नी छतरथ : एकिकडे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या विनोदवीर कपिल शर्मा याने त्याच्या खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत केलं. प्रेयसी गिन्नी छतरथ हिच्यासोबतच्या नात्याला वेगळं नाव देत त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

3/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

प्रियांका चोप्रा- निक जोनास : देसी गर्ल प्रियांका आणि तिचा प्रियकर, अमेरिकन गायक निक जोनास यांनी अखेर त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करत लग्नगाठ बांधली. भारतात, जोधपूरमधील उमेदभवन पॅलेस येथे मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. 

4/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

दीपिका पदुकोण- रणवीर सिंग : हिंदी कलाविश्वातील सर्वांच्याच आवडीची ऑनस्क्रीन जोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणवीर सिंग आणि दीपिता पदुकोण यांनी जवळपास ६ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. इटलीतील लेक कोमो येथे मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. ज्यानंतर त्यांनी मित्रपरिवारासाठी स्वागत सोहळ्यांचंही आयोजन केलं होतं. 

5/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

सुमीत व्यास- एकता कौल : तरुणींच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या अभिनेता सुमीत व्यास याने त्याच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि अनेकींचाच प्रेमभंग झाला. पण, सुमीतच्या आयुष्यात आलेल्या या वळणासाठी चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरणही होतं. त्याने टेलिव्हिजन अभिनेत्री एकता कौल हिच्याशी लग्नगाठ बांधली. 

6/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

नेहा धुपिया- अंगद बेदी : अभिनेत्री नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या लग्नाच्या वृत्ताने अनेकांनाच धक्का बसला होता. कोणतीही पूर्वकल्पना नसताना सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहा आणि अंगदने थेट त्यांच्या विवाहाची बातमी जाहीर केली. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत शीख धर्माच्या चालिरितींनुसार हा लग्नसोहळा पार पडला होता. 

7/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

सोनम कपूर- आनंद अहूजा : बी- टाऊनची फॅशनिस्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री सोनम कपूर हिने प्रियकर आनंद अहूजा याच्याशी लग्नगाठ बांधत करिअरसोबतच खासगी आयुष्यालाहा प्राधान्य दिलं. सोशल मीडियावर या जोडीची बरीच चर्चा होते. 

8/8

Year End 2018 : यंदाच्या वर्षी 'हे' सेलिब्रिटी अडकले लग्नाच्या बेडीत

मिलिंद सोमण- अंकिता कोनवार : आयर्न मॅन म्हणून ओळखला जाणारा आणि शारीरिक सुदृधतेसाठी नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या, इतरांना प्रेरणा देणाऱ्या अभिनेता, मॉडेल मिलिंद सोमण याने त्याची प्रेयसी अंकिता कोनवार हिच्याशी लग्नगाठ बांधली. अलिबागमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला.