मासिकपाळीत 'ही' योगासनं ठरतात फायदेशीर

Yoga For PCOD : बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराला पाहिजे तसा आहार मिळत नाही. याचा गंभीर परीणाम  स्त्रियांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे मासिकपाळीमध्ये सोप्या पद्धतीने आरोग्याची काळजी कशी घ्यावी हे पाहूया.  

Jun 19, 2024, 18:32 PM IST

रोजच्या धावपळीच्या कामाचा  वाईट परीणाम स्त्रियांच्या मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत. 

 

1/6

रोजच्या धावपळीच्या कामाचा  वाईट परीणाम स्त्रियांच्या मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत.   

2/6

आताच्या धावपळीच्या आयुष्यात  खाण्या-पिण्याच्या सवयींपासून ते कपडे परीधान करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे शरीराच्या जडणघडणीवर याचा विपरीत परीणाम होतो. म्हणूनच मासिकपाळीचं चक्र सुरळीत सुरु राहण्यासाठी योगासन करण्याचा सल्ला डॉक्टर कायमच देतात.   

3/6

त्रिकोणासन

सरळ उभं राहून कमेरत वाका. त्यानंतर एक डावा हात तुमच्या उडव्या पायापर्यंत आणा. हा योगा करताना श्वासावर लक्ष केंद्रीत करा. त्रिकोणासन केल्याने तुमच्या ओटीपोटावर ताण येतो.   

4/6

त्यामुळे तुमचे स्नायू मोकळे होतात. त्रिकोणासन केल्याने मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे  मासिकपाळीत सतत चिडचिड होत असल्यास त्रिकोणासन फायदेशीर ठरतं.   

5/6

प्राणायाम

निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम महत्त्वाचा आहे. प्राणायाम केल्याने श्वासावर नियंत्रण राखता येतं, त्यामुळे शरीरिक व्याधी दूर होतात. प्राणायाम केल्याने मानसिक ताण तणाव दूर होण्यास मदत होते. मासिकपाळीमध्ये  मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर प्राणायाम करणं फायदेशीर ठरतं. 

6/6

मासिकपाळीमध्ये  अशक्तपणा जास्त जाणवतो, त्यामुळे शरीरिक हलचाल जास्त होईल अशा प्रकारे व्यायाम करणं टाळावं. त्याचबरोबर मासिकपाळीत नेहमीपेक्षा शरीरात तापमान काही प्रमाणात वाढतं त्यामुळे या दिवसात सुती आणि सैलसर कपडे वापरावेत.