PHOTO: हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी करा 'हे' योगा; कोलेस्ट्रॉल झपाट्याने होईल कमी

Yoga For Lower Cholesterol: बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या वेळा यामुळे अनेक जणांना  उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. रोज योग केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योगाची ही आसने करा.    

Jun 17, 2024, 17:27 PM IST
1/7

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'हे' योगा

2/7

रोज योग केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी योगाची ही आसने करा.  

3/7

अर्ध मत्स्येंद्रासन

 हे आसन करताना जमिनीवर मांडी घालून बसा पाठीचा कणा सरळ ठेवा. डावा पाय वाकवा आणि डाव्या पायाची टाच उजव्या हिपजवळ ठेवा. उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवा. त्यानंतर कंबर, खांदे आणि मान उजवीकडे वळवून खांद्याकडे बघा. श्वास घेत ही स्थिती कायम ठेवा. 

4/7

कपालभाती

कपालभातीमध्ये अनुलोम विलोम केल्याने रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.कपालभाती करण्यासाठी सर्वप्रथम ध्यानमुद्रेत बसा. तळवे आपल्या गुडघ्यांच्या वर ठेवा. दीर्घ श्वास घ्या आणि त्यानंतर पोट आत खेचून वेगाने श्वास सोडा.श्वास सोडताना आणि श्वास घेताना मध्ये काही सेकंद थांबा  

5/7

चक्रासन

चक्रासन करताना गुडघे वाकवून पाठीवर झोपा. तुमच्या पायांमध्ये 12 इंच अंतर ठेवा. आता तुमचे हात उचलून कोपर आणि तुमचे तळवे जमिनीवर तुमच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला ठेवा. श्वास घ्या आणि हळू हळू तुमचे शरीर वर करा. तुमचे हात आणि पाय शक्य तितके सरळ करा, हळूच तुमचे डोके मागे टाका.

6/7

शलभासन

हे आसन करताना तुमचे दोन्ही पाय सरळ ठेवा आणि पायाच्या पंजांना सरळ वरच्या बाजूला ठेवा. त्यानंतर डावा हात डाव्या मांडीखाली आणि उजवा हात उजव्या मांडीखाली ठेवा. तुमचे डोके आणि चेहरा हा सरळ ठेवा. त्यानंतर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे पाय वरच्या बाजूने उचलण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी २० सेकंद या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.  

7/7

त्रिकोनासन

त्रिकोनासन करताना सरळ उभे रहा आणि दोन्ही पायांमध्ये समान अंतर ठेवा. दोन्ही पावलांची पकड जमिनीवर घट्ट आहे याची खात्री करा. एक दीर्घ श्वास आत घेऊन, श्वास सोडत सोडत कंबर सरळ ठेवा आणि उजवीकडे झुकताना दोन्ही हात सरळ रेषेत ठेवा, उजवा हात जमिनीकडे तर डावा हात हवेत येऊ द्या. कंबर न वाकवता एक हात जमिनीला लावा व दुसरा हात सरळ वरच्या दिशेला ताणा नजर डाव्या हाताच्या तळव्याकडे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)