दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

Nov 20, 2020, 14:29 PM IST
1/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

छत्रपती संभाजी राजे यांनी नुकतीच रायगडाला भेट दिली. येथे सुरु असणाऱ्या संवर्धन कामांची पाहणी करत सर्व परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही फोटो पोस्ट करत त्यांनी या भेटीसंदर्भातील माहिती दिली.

2/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

लॉकडाऊननंतर नुकताच दुर्गराज रायगड सर्वांसाठी खुला झाला आहे. रायगड विकास प्राधिकरणामार्फत गडावर सुरू असलेली कामे मार्चनंतर दोन महिने लॉकडाऊनमुळे पूर्णपणे थांबली होती. 

3/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर काही प्रमाणात कामे सुरु करण्यात आली त्या कामांनाही आता पूर्ण वेग आला आहे. या कामांच्या पाहणीसाठी आज रायगडास भेट दिली. 

4/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

याआधी गडावर लागणारा बराचसा कच्चा माल हा रोपवेतून गडावर आणला जायचा. मात्र स्थानिक वादामुळे गेल्या काही महिन्यांपासून रोपवे बंद आहे, तो कधी सुरू होईल हे निश्चित नाही. मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी याचा गडावरील कामांवर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही. 

5/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

अधिकारी दररोज पायी गडावर जातात. पूर्वी रायगड बांधत असताना ज्या पद्धतीने सर्व साहित्य गाढवांवर लादून वर पाठविले जायचे, त्याच पद्धतीने आजही अव्याहतपणे काम सुरुच आहे. 

6/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

रोप वे बंद असल्यामुळं गडावर सुरु असणाऱ्या कामांसाठी आवश्यक असलेल्या चुना, रेतीपासून ते अगदी बांधकामाच्या दगडांपर्यंतची सर्व सामग्री मजुरांमार्फत गाढवांच्या पाठीवरून गडावर पोहोचवली जात आहे. 

7/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

आज प्राधिकरणाचे अधिकारी व जवळपास दीडशे मजूर न थकता आपले काम करत आहेत.  अनेक अडचणी समोर असूनही रायगड संवर्धनाच्या कार्यात खंड पडलेला नाही.

8/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

याचबरोबर शिवभक्तांना राजसदरेवर जाऊन महाराजांचे दर्शन घेता यावे यासाठी पुरातत्व विभागाकडे राजसदरेवरील बँरिकेटस् काढण्यात यावेत, यासाठी पाठपुरावा सुरु आहे.

9/9

दुर्गराज रायगडाच्या पाहणीसाठी संभाजी राजेंची गडाला भेट

(सर्व छायाचित्रे - फेसबुक / Yuvraj Sambhajiraje Chhatrapati)