पाकिस्तानचा मलिंगा: PoK मधील मजुराच्या मुलाचा प्रेरणादायी प्रवास; म्हणतो, 'क्रिकेटसाठी मी...'

Lasith Malinga Of Pakistan: पाकिस्तानमधील अनेक खेळाडू जायबंदी झाल्याने आशिया चषक स्पर्धेच्या आपल्या शेवटच्या सुपर-4 सामन्यामध्ये अनेक नवख्या खेळाडूंना संधी दिली. भारताविरुद्धच्या सामन्यानंतर पाकिस्तानने एक दोन नाही तब्बल 5 खेळाडू बदलले. मात्र या सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला पराभूत करत आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना पाकिस्तानने गमावला असला तरी सामन्यामध्ये एका खेळाडूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हा गोलंदाज पाकिस्तानला लसिथ मलिंगा म्हणून ओळखला जातो. त्याच्याबद्दल जाणून घेऊयात...

| Sep 15, 2023, 15:30 PM IST
1/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

मागील काही वर्षांमध्ये पाकिस्तानच्या संघाकडून अनेक गोलंदाजांनी पदार्पण केलं आहे. यापैकी अनेक गोलंदाज हे सध्या जगातील आघाडीच्या गोलंदाजांपैकी आहेत. याच यादीमध्ये गुरुवारी आणखीन एका नावाचा समावेश झाला. हे नाव म्हणजे जमान खान.

2/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

मात्र पाकिस्तानच्या संघात नव्याने सहभागी झालेला जमान खान हा अधिक स्पेशल आहे. यामागील कारण म्हणजे तो पाकिस्तानचा पहिला स्लिंगर वेगवान गोलंदाज आहे. स्लिंगर गोलंदाज म्हणजे हातवर करुन एका ठराविक अँगलने गोलंदाजी करणारा खेळाडू. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लसिथ मलिंगाप्रमाणे गोलंदाजी करणारा गोलंदाज. 

3/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

बुधवारी पाकिस्तानचा महत्त्वाचा गोलंदाज असलेला नसीम शाह जायबंदी झाल्याने त्याला संघाबाहेर बसावं लागलं. त्याच्या जागी जमान खानला संघात संधी देण्यात आली आणि त्याचे पहिल्याच प्रयत्न आपली छाप पडली.

4/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर या छोट्याश्या गावातील कुटुंबामध्ये जन्म झालेला जमान खान हा केवळ 21 वर्षांचा आहे. टेप बॉल प्रकारच्या क्रिकेटमधून जमान खान हा काश्मीर लीग स्पर्धेतून खेळू लागला. जमानने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शेअर केलेल्या एका व्हिडीओत क्रिकेटमधील प्रवासाबद्दल सांगितलं आहे. 

5/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

"माझा भाऊ आणि वडील हे मजुरी करतात. आमच्या घराजवळच्या गल्लीमध्ये काही मुलांना क्रिकेट खेळताना पाहून मी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेट खेळण्यासाठी मी मदरशामधील शिकवणीसाठीही जायचो नाही," असं जमानने सांगितलं.

6/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

"माझ्या एका नातेवाईकाने मला वेगवान गोलंदाजी करताना पाहून गावातील अंडर-16 ट्रायलमध्ये भाग घेण्यास सांगितलं. नशीबाने माझी निवड झाली आणि माझ्या क्रिकेटमधील प्रवास खऱ्या अर्थाने सुरु झाला," असं जमान म्हणाला.

7/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

जमान खानला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाकिस्तानच्या 19 वर्षांखालील संघात स्थान मिळालं. त्यानंतर पाकिस्तान सुपर लीग 2022 च्या पर्वामध्ये लाहोर कलंदर्सच्या संघामध्ये स्थान मिळालं. त्याने शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफसारख्या गोलंदाजांबरोबर भन्नाट कामगिरी केली. 

8/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

जमानने आपल्या पहिल्याच पाकिस्तान सुपर लीगच्या पर्वात 13 सामन्यांमध्ये 18 विकेट्स घेतल्या. सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी राहिला. 

9/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

पाकिस्तान सुपर लीगच्या 2022 च्या पर्वात शाहीन आफ्रिदीने 20 विकेट्स घेतल्या. तर फिरकी गोलंदाज शादाब खानने 19 विकेट्स घेतल्या. 18 विकेट्ससहीत जमान तिसऱ्या स्थानी होता.

10/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

लाहोर कलंदर्सने पहिल्यांदा पाकिस्तान सुपर लीग जिंकण्यामध्ये जमानने गोलंदाजीच्या माध्यमातून मोलाची भर घातली. "आम्ही त्याला काश्मीर टी-20 लीगमध्ये पाहिलं तेव्हाच त्याला संघात घ्ययाचं होतं. तो फार छान यॉर्कर टाकतो. हा आमच्या संघात अगदी उत्तम कामगिरी करु शकतो असं आम्हाला वाटलं," अशी प्रतिक्रिया जमानबद्दल बोलताना लाहोर कलंदर्सचे गोलंदाजी प्रशिक्षक वकास अहमद यांनी नोंदवली.

11/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

पाकिस्तान सुपर लीगच्या यावर्षीच्या म्हणजेच 2023 च्या पर्वात त्याने 13 सामन्यांमध्ये 15 विकेट्स घेतल्या. पुन्हा ही मालिका लाहोर कलंदर्सनेच जिंकली. 

12/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

लाहोर कलंदर्सने पाकिस्तान सुपर लीग जिंकल्यानंतर 6 दिवसांनीच जमानने शारजाह येथे अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामधून पदार्पण केलं. जमानकडे सध्या पाकिस्तानला मलिंगा म्हणून पाहिलं जातं.

13/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

जमानने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शेवटचं षटक टाकलं. मात्र त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. त्यामुळे सामना संपल्यानंतर त्याला अश्रू अनावर झाले.

14/14

zaman khan Lasith Malinga Of Pakistan

आता जमान पाकिस्तानच्या संघामधून विश्वचषक स्पर्धा खेळणार का हे पहावं लागणार आहे. असं झाल्यास भारताबरोबरच इतर अनेक देशांचं टेन्शन नक्कीच वाढवणार आहे यात शंका नाही.